Crime News: व्हिडीओ कॉलवर केले अश्लिल रेकॉर्डिंग; तरुणाला धमकी देत महिलेने उकळली खंडणी

व्हिडीओ कॉलवर केले अश्लिल रेकॉर्डिंग; तरुणाला धमकी देत महिलेने उकळली खंडणी
Jalgaon Cyber Crime
Jalgaon Cyber CrimeSaam tv

जळगाव : तरुणाला आलेल्या व्हिडीओ कॉलद्वारे त्याच्या नकळत अश्लिल व्हिडीओ कॉल रेकॉर्डिंग पलीकडून बोलणाऱ्या महिलेने केली. या व्हिडीओ कॉलची केलेली रेकॉर्डिंग (Cyber Crime) व्हायरल करण्याची धमकी देत एक लाख ३९ हजार ७४० रुपयांची ऑनलाईन खंडणी उकळली. याबाबत सायबर पोलिस (Cyber Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Live Marathi News)

Jalgaon Cyber Crime
Wardha News: तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्याविना मी राहू शकत नाही..पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीच्या नावे निनावी पत्राने खळबळ

खडका (ता. भुसावळ) येथील ३२ वर्षीय तरुणाला २१ व २२ नोव्हेंबरदरम्यान अनोळखी महिला युजर्सकडून व्हॉट्‌सअ‍ॅप कॉल आला. व्हिडीओ कॉलद्वारे अश्लाख्य चित्रण करून ते रेकॉडिंग व्हायरल करण्याची धमकी देत पीडित तरुणाला खंडणीची मागणी केली. वेळोवेळी पीडित तरुणाकडून एक लाख ३९ हजार ७४० रुपयांची खंडणी ऑनलाईन उकळली. याबाबत घनश्याम अरुण महाजन यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे तपास करीत आहेत.

युट्यूब-क्राईम ब्रांचच्या नावे फोन

आम्ही युट्यूबमधील अधिकारी बोलतोय, क्राईम ब्रांचमधून बोलतोय, अशी बतावणी करून भीती घालून या तरुणाला धमकावण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले. अगोदर ही मंडळी व्हॉटस्‌ॲपवरून साध्या पद्धतीने फ्रेंडशीप चॅट करतात. त्यानंतर अश्लाख्य व्हिडीओ अपलोड करण्याचे धमकावून खंडणी उकळली जात असल्याने तरुणांनी अशांना न घाबरता पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन साबर पोलिसांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com