Jalgaon: गिरणा नदीवर नवीन पुल होणार; वाहतुकीची कोंडी सुटणार

गिरणा नदीवर नवीन पुल होणार; वाहतुकीची कोंडी सुटणार
Jalgaon Girna River Bridge
Jalgaon Girna River BridgeSaam tv
Published On: 

जळगाव : जळगाव आणि धरणगाव तालुक्याला जोडणाऱ्या गिरणा नदीवरून (Girna River) दुहेरी वाहतुक सुरू आहे. यामुळे अनेकदा या पुलावर वाहतुकीची कोंडी होत असते. परंतु, आता ही कोंडी सुटणार आहे. कारण नदीवरील या पुलास समांतर असलेल्‍या (Jalgaon) बांभोरी– निमखेडीला जोडून असलेल्‍या जुन्‍या पुलाच्‍या ठिकाणी आता नवीन बंधारा कम पुलास राज्याच्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे. (Jalgaon News Girna River News Bridge)

Jalgaon Girna River Bridge
अल्पवयीन मुलीचा विवाह; सासरी येताना नजर चुकवत तिने गाठले पोलीस ठाणे, जळगावशी आहे कनेक्‍शन

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाला लागून असणाऱ्या बांभोरी- निमखेडी- जळगाव- आसोदा- भादली प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ५९ वरील ४/५०० किलोमीटरवर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या पुलामुळे महामार्गावरील एकमेव पुलावर होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीला आळा बसण्यासाठी उपयोग होणार आहे. सोबत वाळूच्या उत्खननालाही चाप बसणार आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा पूल मंजूर करून आणला असून, त्याला राज्याच्या अर्थसंकल्पातून निधीही मिळणार असल्याने लवकरच त्याचे काम मार्गी लागणार आहे.

४० कोटींचा प्रस्ताव

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतुकीची वारंवार होणारी कोंडी, यातून होणारे अपघात आणि एकंदरितच त्रास दूर व्हावा, यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा तत्कालीन पालकमंत्री पाटील यांनी बांभोरी ते निमखेडीदरम्यान गिरणा नदीवर ४० कोटी निधीचा बंधारायुक्त समांतर पूल बांधण्याच्या कामाचा पाठपुरावा सुरू केला होता, त्यास यश आले आहे.

पाण्याचा प्रश्‍नही सुटणार

या पुलामुळे वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत मिळेल. यासोबत बांभोरी आणि निमखेडी परिसरातील लोकांना मुख्य पुलावर न येता सुरक्षितपणे गिरणा नदी पार करता येईल. विद्यापीठासह परिसराला नेहमी पाण्याची समस्या भेडसावत असते. या पार्श्‍वभूमीवर गिरणा नदीत वाहून जाणारे पाणी साठविण्यात आल्याने विद्यापीठासह परिसराचा पाण्याचा प्रश्‍न कायमचा निकाली निघणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.