Jalgaon Temperature: दोन दिवसातच जळगाव झाले ‘हॉट’; ६ अंशाने वाढले तापमान

दोन दिवसातच जळगाव झाले ‘हॉट’; ६ अंशाने वाढले तापमान
Jalgaon Temperature
Jalgaon TemperatureSaam tv

जळगाव : जळगाव जिल्हा तापमानाच्‍या बाबतीत हॉट समजला जातो. दरवर्षी मे महिन्‍यात ४५ ते ४८ अंशापर्यंत येथील तापमान जाते. यंदा मात्र एप्रिल महिन्यातच (Temperature) तापमानाने ४२ अंशापर्यंत मजल मारली आहे. मागील दोन दिवसात पारा ६ अंशाने वाढला असल्‍याने (Jalgaon) जळगाव सर्वात ‘हॉट’ बनले आहे. (Latest Marathi News)

Jalgaon Temperature
Beed Crime News: मोबाईल चोरीची तक्रार दिल्याने तरुणाची निर्घृण हत्या, बीड पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु!

मार्चच्‍या शेवटच्‍या आठवड्यापासून वाढत असलेले तापमान यंदा एप्रीलच्‍या मध्‍यापर्यंत अवकाळी पाऊस व हवामान बदलामुळे कमीच राहिले. दोन दिवसांपुर्वी पर्यंत गारवा वाटत होता. मात्र मागील दोन दिवसांपासून तापनात अचानक वाढ झाली असून सकाळी दहा वाजल्‍यापासूनच उष्‍णतेच्‍या झळा जाणवत आहेत. यामुळे जळगावचा पारा आता ४२ अंशावर पोहचला आहे.

Jalgaon Temperature
Akola News : देवेंद्र फडणवीसांचा दाैरा अन् ठाकरेंच्या आमदारासह 125 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; अकाेल्यात नेमकं काय घडलं

जिल्‍हा चाळीशी पार

बुधवारी सकाळपासूनच (Jalgaon Temperature) उन्हाचे असह्य चटके जाणवत होते. दुपारी उन्हाच्या चटक्यांमुळे काही रस्ते निर्मुनष्य झाले होते. जे नागरिक बाहेर पडत होते. ते डोक्याला रुमाल, गॉगल, महिला सनकोट, स्कार्फ बांधूनच बाहेर पडलेल्या दिसत होत्या. उन्हापासून सुटका मिळण्यासाठी शितपेयांच्या गाडीवर गर्दी दिसून आली. ममुराबाद तापमान केंद्रावर ४१.६ अंश तापमानाची नोंद झाली. किमान तापमान २६.८ अंश होते, तर तापमान अभ्यासक नीलेश गोरे यांच्या ‘वेलनेस’ने जळगावचे तापमान ४२ अंश नोंदले. एकंदरीत जळगाव जिल्‍ह्यातील सर्वच शहरातील तापमान हे चाळीशी पार गेले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com