Gulabrao Patil
Gulabrao Patil

जिल्‍हा बँकेने ताकद दिली; आता महाविकास आघाडीवरच निवडणुका : गुलाबराव पाटील

जिल्‍हा बँकेने ताकद दिली; आता महाविकास आघाडीवरच निवडणुका : गुलाबराव पाटील
Published on

जळगाव : जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला (Maha Vikas Aaghadi) यश मिळाले; त्यामुळे येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार असल्‍याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सांगितले. (Jalgaon-news-Gulabrao-Patil-statment-will-ZP-and-municipal-elections-together-mahavikas-aaghadi)

Gulabrao Patil
अवकाळी पावसामुळे लाखोंचे नुकसान

जळगावात माध्‍यमांशी संवाद साधताना मंत्री पाटील बोलत होते. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने २१ पैकी २० जागा जिंकून वर्चस्‍व राखले आहे. या यशामुळे महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांना बळ मिळाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुका जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जातील यााबाबत पाटील यांनी सांगितले, की जिल्हा बँकेवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षाने एकत्रीत यश मिळवून महाविकास आघाडीचा झेंडा फडकविला आहे. महापालिकेच्या निवडणुका दोन वर्षांनी होतील. पण, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपालिकेच्या निवडणुका येत्या दोन ते सहा महिन्यात लागणार आहेत. यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढण्याचे आदेश दिले आहेत.

तिघे एकत्र येणारच

राज्यात तीन पक्षाचे सरकार येईल, असे कुणाला वाटत नव्‍हते. परंतु तीन पक्षाचे सरकार आले व ते चालत आहे. मग आता देखील जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीत आम्ही नक्की एकत्र येवू, असा विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com