Gulabrao Patil
Gulabrao PatilSaam tv

Gulabrao Patil: तर राष्ट्रवादीच सत्तेत आली असती; गुलाबराव पाटलांचे खळबळजनक वक्‍तव्‍य

तर राष्ट्रवादीच सत्तेत आली असती; गुलाबराव पाटलांचे खळबळजनक वक्‍तव्‍य
Published on

जळगाव : भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेसने पहाटे कोंबडा आरविण्यापूर्वीच सत्तेत मंत्रिपदाची शपथ घेतली होती. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उठाव केला नसता, तर राष्ट्रवादी काँग्रेस (BJP) भाजपसोबतच गेली असती, असे धक्कादायक विधान राज्याचे पाणीपुरवठामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केला आहे. (Breaking Marathi News)

Gulabrao Patil
धूम स्टाइल हौस जीवघेणी, १० महिन्यांत ९७ अपघात, ७५ घटनांमध्ये १८ वर्षांखालील मुलांचा बळी

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार शिर्डी (Shirdi) येथील अधिवेशनानंतर कोसळेल, असे भाकीत केले आहे. यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांना प्रतिक्रिया दिली.

आमचे सरकार भक्‍कम

जयंत पाटील यांनी शिबिर संपल्यानंतर सरकार कोसळण्याचा दावा केला आहे., मात्र आज शिबिर संपले आहे. त्यामुळे आपण सरकार पडण्याची वाट पाहत आहोत. आपले आमदार आपल्यासोबत कायम राहावे म्हणून त्यांना असे बोलावे लागते. आमचे सरकार पडणार नाही, ते भक्कम आहे. दोन वर्षाचा कार्यकाळ आमचे सरकार पूर्ण करेल, असा दावाही त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com