Jalgaon News: घरगुती गॅसचा काळाबाजार; पोलिसांची एकावर कारवाई

घरगुती गॅसचा काळाबाजार; पोलिसांची एकावर कारवाई
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On: 

जळगाव : घरगुती सिलेंडरचा बेकायदेशीर वापर केला जात आहे. प्रवाशी रिक्षांमध्‍ये या (Gas) गॅसचा वापर केला जात असून प्रवासी रिक्षात गॅस भरणाऱ्यावर (Jalgaon) जळगाव शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. (Live Marathi News)

Jalgaon News
Cyber Crime: कुरीअरसाठी गुगलवर नंबर शोधणे पडले महागात; ९८ हजार रुपयांची फसवणूक

जळगावातील एका दुकानात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून बेकायदेशीररित्या प्रवासी रिक्षांमध्ये गॅस भरुन परिसरातील काळाबाजार सुरु होता. याबाबत पोलिसांना (Police) माहिती झाल्‍यानंतर त्‍याठिकाणी धाड टाकली. याठिकाणाहून गॅस भरणारा वर कारवाई करून त्यांच्याविरुद्ध शहर पोलिसात (Jalgaon Police) गुन्हा दाखल करण्यात आला.

२३ हजाराचा मुद्देमाल जप्‍त

पोलिसांनी धाड टाकल्‍यानंतर तेथून १७ हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रॉनिक मोटार, पंप व ६ हजार रुपये किंमतीचे तीन गॅस सिलिंडर असा एकूण २३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कारवाई करण्यात आलेल्या तरुणाविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com