Jalgaon: मुलं अभ्यासात गुंग ‎अन्‌ पित्याने घेतला गळफास

मुलं अभ्यासात गुंग ‎अन्‌ पित्याने घेतला गळफास
Suicide Case
Suicide CaseSaam tv

जळगाव : शिवाजीनगरातील काळेनगरात धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. घरात लहान मुलं अभ्यास करत असताना या ‎मुलांच्या‎ ‎पाठीमागे‎‎ पलंगावर‎ झोपलेल्या ‎पित्याने अचानक पंख्याला गळफास घेत (Suicide) आत्महत्या‎ केली. समाधान रामदास सुरवाडे (वय‎ ४५, रा. काळेनगर, शिवाजीनगर)‎ असे मयताचे नाव आहे. अचानक पित्याला लटकलेला पाहून मुलांनी किंचाळतच घराबाहेर धाव घेतली शेजाऱ्यांच्या मदतीने दवाखान्यात हलवले. (Jalgaon News Suicide Case)

Suicide Case
भयंकर घटना! वाहनाची हवा चेक करायला खाली उतरले, अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं

समाधान यांना दम्याचा दुर्धर आजार जडला होता, त्यात उपचार करूनही त्रास कमी होत नसल्याने ते प्रचंड कंटाळले होते. दुपारच्या (Jalgaon News) सुमारास त्यांची दोन्ही मुलं घरात अभ्यास करत बसलेल होते. त्याच वेळेस त्यांनी त्यांच्या वृद्ध आईस किरणा दुकानावर पाठवले. स्वतः घरात जावून मुलांजवळील पलंगावर झोपलेले असताना मुलांची नजर चुकवून त्यांनी अचानक छताच्या पंख्याला रुमालाने गळफास घेतला. हे दृष्य बघताच भेदरलेल्या मुलांनी घरातून पळ काढत शेजाऱ्यांकडे धाव घेतली.

कुटुंबीयांचा आक्रोश

शिवसेना (Shiv Sena) पदाधिकारी विजय बांदल यांनी तत्काळ इतर तरुणांच्या मदतीने समाधान सुरवाडे यांचा मृतदेह खाली उतरवून जिल्‍हा रुग्णालयात हलवले. येथे तपासणी केल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत करताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. डॉ. श्रावणी हुंबे यांनी शहर पोलिसांत खबर दिल्यावरुन अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलिस नाईक ओमप्रकाश सोनी करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com