राज्‍यपालांचा ताफा येण्यापुर्वी कार्यकर्ते ताब्‍यात; राष्‍ट्रवादीकडून निषेध

राज्‍यपालांचा ताफा येण्यापुर्वी कार्यकर्ते ताब्‍यात; शिवाजी महाराजांबद्दल केलेल्‍या वक्‍तव्‍याचा राष्‍ट्रवादीकडून निषेध
Jalgaon NCP
Jalgaon NCPSaam tv
Published On

जळगाव : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राज्यपालांना काळे झेंडे दाखवण्याचा नियोजन केले होते. परंतु, राज्यपालांचा ताफा येण्यापुर्वीच पोलिसांनी राष्‍ट्रवादीचे (NCP) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्‍यात घेतले. (jalgaon Before the arrival of Governor BhagatSingh Koshnyari the activists were arrested)

Jalgaon NCP
Nandurbar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या पुतळ्याचे दहन; भाजपकडून आघाडी सरकारचा निषेध

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (BhagatSingh Koshnyari) यांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध व्यक्त केला. राज्यपाल कोश्यारी जळगाव (Jalgaon) दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत जैन हिल्स व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जैन हिल्स येथून कार्यक्रम आटोपून राज्यपाल दुपारी एक वाजता विद्यापीठाकडे निघणार होते. याच रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या विरोधात घोषणा देऊन निषेध करण्यासाठी झेंडे दाखविण्याचा प्रयत्‍न केला.

पोलिसांकडून धरपकड

आंदोलनाच्‍या पवित्र्यात असलेल्‍या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवणार होते. त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार निषेध केला. या वक्तव्याची तक्रार राष्ट्रपती यांच्याकडे करणार असून त्यांना लवकरात लवकर या पदावरून हटवण्याची मागणी करणार असल्याचेही राष्‍ट्रवादीतर्फे सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com