जळगाव : कोरोनामुळे आषाढीची पायी वारी जात नव्हती. परंतु, यंदा कोरोनाचे निर्बंध उठल्याने दोन वर्षांच्या खंडानंतर संत मुक्ताई पालखीची आषाढी पायी वारी रवाना होणार आहे. या मुक्ताई पालखीचे यंदा 3 जूनला पंढरपूरकडे होणार प्रस्थान होणार आहे. (jalgaon news ashadhi wari Saint Muktai Palkhi footsteps this year)
कोरोनामुळे (Corona) गेली दोन वर्षे संत मुक्ताईच्या आषाढी वारीवर निर्बंध होते. त्यामुळे पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन घेणे वारकऱ्यांना अशक्य झाले होते. यंदा मात्र निर्बंध शिथिल झाल्याने संत मुक्ताई (Muktai Palkhi) आषाढी वारी पालखी सोहळा ३ जूनला पंढरपूरकडे रवाना होणार आहे.
सर्वात लांबची पालखी
आषाढी वारीनिमित्त (Ashadhi Wari) पंढरपूरमध्ये दाखल होणाऱ्या संतांच्या मानाच्या पालख्यांमध्ये संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे वेगळे महत्त्व आहे. पंढरपूरमध्ये सर्वाधिक लांब अंतरावरून येणारा ही एकमेव पालखी आहे. त्यामुळे इतर पालखी सोहळ्यांपेक्षा ही पालखी लवकर पंढरपूरकडे मार्गस्थ होते.
३३ दिवसांचा पायी प्रवास
यंदा हा पालखी सोहळा संत मुक्ताईंचे समाधीस्थळ असलेल्या कोथळी, मुक्ताईनगरातून ३ जूनला पंढरपूरकडे रवाना होईल. तब्बल ३३ दिवसांचा पायी प्रवास करून जुलैला विसावा पादुकांजवळ संतश्रेष्ठ नामदेव महाराज दिंडी फड़ाचेवतीने पालखी सामोरे येत पहिला मानाचा मुक्ताई पालखी सोहळा पंढरीत दाखल होईल. ५ जुलैला आषाढ षष्ठीला तीन दिवस आधीच हा सोहळा भू वैकुंठ पंढरपूरात दाखल होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.