घराच्‍या परिसरात केले पक्षांसाठी घरटे; आता पसरला हजारो पक्ष्‍यांचा आवाज

घराच्‍या परिसरात केले पक्षांसाठी घरटे; आता पसरला हजारो पक्षांचा आवाज
Jalgoan
JalgoanSaam tv

जळगाव : जंगलात घर बांधणे शक्‍य नाही. मग जंगलाचा लूक घराला दिला तर. याच विचारातून अविनाश काटे आणि त्यांच्या पत्नी वैशाली काटे यांनी घराच्‍या परिसरात जंगल परिसर तयार केला. या जंगलात (Forest) हजारो चिमण्या दाना खायला व पाणी प्‍यायला येत असतात. (jalgaon news Nests for parties made in the vicinity of the house)

Jalgoan
कारसह सागवानी लाकूड जप्त

कलेचे प्राध्यापक असलेले अविनाश काटे हे जळगावात (Jalgaon) वास्‍तव्‍यास आहेत. शहरातील बिबा पार्क परिसरात राहायला गेल्यानंतर त्यांनी घराजवळ विविध प्रकारची झाडे लावली. झाडे वाढल्यानंतर त्याठिकाणी पक्षी येऊ लागले. त्यात सर्वाधिक संख्या ही चिमण्यांची होती. घराजवळ चिमण्या येत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी चिमण्यांसाठी टाकाऊ वस्तुंपासून घरटी उभारली. त्यात चिमण्या राहू लागल्या. हळूहळू चिमण्यांची संख्या वाढली. मग अविनाश काटे यांनी आपल्या कॉलनीतील लोकांना चिमण्यांसाठी पाणी, दाणे अशी व्यवस्था करायला लावली. त्याला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

पक्षांच्‍या आवाजातही शांतता

काटे दाम्पत्याने घराच्या आजूबाजूला पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी लावली आहेत. सकाळी आणि सायंकाळी ते पक्ष्यांना न चुकता दाणेही टाकतात. माणूस कितीही टेन्शनमध्ये असला तरी पक्ष्यांच्या आवाजामुळे खूप शांत फिल होत असल्याचे वैशाली काटे यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com