हतनुर धरणाचे 30 दरवाजे उघडले

हतनुर धरणाचे 30 दरवाजे उघडले
Hatnur Dam
Hatnur DamSaam tv
Published On

जळगाव : दोन दिवसांपासून पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्र भरले आहे. त्यामुळे आज सकाळी धरणाचे ३० दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीला पूर आल्‍याने (Jalgaon News) नदी काठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (jalgaon news 30 gates of Hatnur Dam opened)

Hatnur Dam
भुसावळ– पंढरपूर स्‍पेशल रेल्‍वे; दोन दिवस गाड्या सुटणार

मध्य प्रदेशातल्या (Madhya Pradesh) तापी नदीच्या उगम स्थानाच्या परिसरात बुधवार झालेल्या पावसामुळे हतनूर धरणातील (Hatnur Dam) पाणीसाठी वाढला आहे. उमगस्थानाजवळच्या पावसाचे पाणीही धरणात वाहून आल्याने हतनूर धरण भरले आहे. त्यामुळे आता धरणाचे ३० दरवाजे उघडण्यात आले आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत धरणाचे 3० दरवाजे उघडण्यात आले होते.

४२ हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग

जळगाव जिल्ह्यातील हतनुर धरणाचे 30 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून हतनुर धरणातून तापी नदी पात्रात 42 हजार 378 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com