Cyber Crime : बोनसच्या नावाखाली खोटा चेक देऊन शेतकऱ्याची २३ लाख ४७ हजारांचा गंडा

Jalgaon News : रक्कम वाढली असून, ती तुम्ही इतर पॉलिसीत गुंतवणूक केल्यास जास्तीचा नफा मिळेल, असे सांगून विश्वास संपादन केला.
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv

जळगाव : शेतकरी, सामान्य नागरिक पैशांची थोडी गुंतवणूक म्हणून पॉलिसी काढत असतो. अशाच प्रकारे पॉलिसी (Jalgaon) काढलेली असताना त्यावर बोनस मिळाला असल्याचे सांगत अतिरिक्त लाभ मिळाल्याचा खोटा चेक व्हॉट्‌सॲपवर दिला. यातून विश्वास संपादन करत २३ लाख ४७ हजार रुपयांचा गंडा शेतकऱ्याला (Farmer) घालण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Cyber Crime
Dhule Accident : दुचाकीला कारची मागून धडक; अपघातात भावा-बहिणीचा मृत्यू

रावेर (Raver) तालुक्यातील ऐनपूर येथील शेतकरी संजय त्र्यंबक कुलकर्णी (वय ७१) यांना साधारण १४ वर्षांपूर्वी अर्थात २०१० मध्ये एकाने फोन करत तुमच्या पॉलिसीवर बोनस जाहीर झाला असल्याचे सांगितलॆ. तसेच त्याचा (Cyber Crime) खोटा चेक व्हॉट्‌सॲपवर पाठविला. इतकेच नाही तर गुंतवणुक केलेली रक्कम वाढली असून, ती तुम्ही इतर पॉलिसीत गुंतवणूक केल्यास जास्तीचा नफा मिळेल, असे सांगून विश्वास संपादन केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cyber Crime
Maval Lok Sabha : मावळ लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत; वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज

संबंधितांवर विश्वास ठेवून संशयिताने सांगितल्यानुसार संजय कुलकर्णी यांच्याकडून वेळोवेळी २३ लाख ४७ हजार ८७ रुपये बँक खात्यांद्वारे स्वीकारले. मात्र कार्यकाळ पूर्ण झाल्याने पॉलिसीचा नफा किती झाला, हे बघण्यासाठी गेले असता, असा कुठलाच नफा झाला नसून जमा केलेले पैसेही लुटण्यात आल्याचे निदर्शनास आले. यानंतर संजय कुलकर्णी यांनी सायबर पोलिसांत तक्रार दिली असून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com