Bribe Case : परवाना नूतनीकरणासाठी घेतली १५ हजाराची लाच; विद्युत निरीक्षक एसीबीच्या ताब्यात

Jalgaon News : विद्युतीकरणाचे कामे घेतात. परवान्याची मुदत संपत आल्याने त्याचे नुतनीकरण करण्यासाठी त्यांनी खाते उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा विद्युत निरीक्षक गणेश सुरळकर याच्याकडे अर्ज केला
Bribe Case
Bribe CaseSaam tv
Published On

जळगाव : विद्युत कामे करणाऱ्या परवानाधारक कंत्राटदाराकडून परवाना नुतनीकरणासाठी लाचेची मागणी केली. या दरम्यान १५ हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना खाते उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या (Jalgaon) विद्युत निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. (Latest Marathi News)

Bribe Case
Mahavitaran Bill : सव्वा दोन लाख वीज ग्राहकांकडे महावितरणचे घेणे; तब्बल ३८८ कोटींची थकबाकी

परवानाधारक कंत्राटदार असलेले तक्रारदार हे शासकीय विद्युतीकरणाचे कामे घेतात. परवान्याची मुदत संपत आल्याने त्याचे नुतनीकरण करण्यासाठी त्यांनी खाते उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा विद्युत निरीक्षक गणेश सुरळकर याच्याकडे अर्ज केला होता. हा परवाना नूतनीकरण (Jalgaon ACB) करण्यासाठी सुरळकर याने १५ हजार रुपयांची मागणी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bribe Case
Pandharpur News : विठुरायाच्या दानपेटीत साडेतीन कोटी; माघी यात्रेत लाखो भाविकांकडून दान

तक्रारदाराने याबाबत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल वालझडे यांच्या पथकाने सापळा रचून तक्रारदाराकडून १५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गणेश सुरळकर यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com