Cyber Crime : 'टास्क'च्या नावावर ३१ लाखांची फसवणूक; सायबर चोरांकडून डॉक्टरची लुबाडणूक

Jalgaon News : व्हॉट्सॲपवरून संपर्क करून तुमच्या मोबाईल क्रमांकावरून महिलांशी अश्लील कृत्य करण्यात आले असून तुमच्याविरुद्ध मुंबईच्या बांद्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv
Published On

जळगाव : ट्रायमधून बोलत असल्याचे सांगून मनिलॉड्रिंग अंतर्गत बांद्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे खोटे भासवून जळगावातील एका डॉक्टरची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यात डॉक्टरला ३१ लाख ५६ हजार ६४ रुपयांत फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर दुसऱ्या एका घटनेत ऑनलाइन टाक्स गेमच्या नावे तरुणाला सायबर गुन्हेगारांनी साडेपाच लाखांचा चुना लावला आहे.

जळगाव शहरातील डॉ. डी. डी. उगले (वय ५८) यांनी सायबर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार ९ जानेवारीला ट्रायमधून राधिका नावाने महिलेचा फोन आला. त्यानंतर व्हॉट्सॲपवरून राजेश प्रधान, मुकेश बॅनर्जी यांनी संपर्क करून तुमच्या मोबाईल क्रमांकावरून महिलांशी अश्लील कृत्य करण्यात आले असून तुमच्याविरुद्ध मुंबईच्या बांद्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबाबतची नोटीस पाठवून तुमच्या खात्यात २ कोटी जमा झाल्याबाबत ‘आरटीजीएस’ची खोटी पावती दाखवून भीती दाखविण्यात आली. 

Cyber Crime
Ambarnath MNS : अंबरनाथमधील रिक्षाचालकाच्या मृत्यूवरून मनसे आक्रमक; अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

गुन्हा दाखल करण्याची भीती  

तर तुम्हाला आता ‘मनी लॉड्रिंग’च्या गुन्ह्यात अटक करावी लागेल, अशी भीती दाखवून तब्बल ३१ लाख ५६ हजार ६४ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. उगले यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या वरून संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक बबन अव्हाड तपास करीत आहेत.

Cyber Crime
Nylon Manja : नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या तीन जणांवर गुन्हा दाखल; नंदुरबार, प्रकाशामध्ये पोलिसांची कारवाई

तरुणाला साडेपाच लाखांचा चुना
तसेच धरणगाव तालुक्यातील शेरी येथील तरुणाला टेलिग्राम या सोशल मीडिया साइटवर पैसे कमावण्याचे आमिष दाखवत टास्क गेमच्या नावे तब्बल ५ लाख ३२ हजार ६८८ रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. मोनिष दत्तू ठाकूर हा विद्यार्थी टेलिग्राम साइटवर ऑनलाइन टास्क गेम खेळत असताना त्याला वेगवेगळे टास्क सांगून त्याच्या बँक खात्यांची माहिती घेत खात्यातून तब्बल ५ लाख ३२ हजार ६८८ रुपये इतकी रक्कम ऑनलाइन पद्धतीने गंडविण्यात आली. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com