चोपडा (जळगाव) : चोपडा तालुक्यातील एका गावात बारावर्षीय मुलीस जबरदस्तीने शेतात ओढत नेत अत्याचार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीसोबत असलेल्या तिच्या लहान बहिणीने गावात येऊन आरडाओरड केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेने जळगाव जिल्हा हादरला आहे.
राज्यातील बदलापूरची घटना घडल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. यानंतर जळगाव जिल्ह्यात हि धक्कादायक घटना समोर आली आहे. चोपडा तालुक्यातील विरवाडे परिसरात दोघी बहिणी शेतात कामाला गेल्या होत्या. सायंकाळी शेतातील काम आटोपून दोघी घरी येण्यासाठी निघाल्या होत्या. दरम्यान रस्त्यावर बारा वर्षीय चिमुरडीला २५ वर्षीय संशयिताने विरवाडे शिवारातील शेतात ओढून नेले. यानंतर (Crime News) तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिचा दगडाने ठेचून निर्घृण खून केला. खुनानंतर संशयिताने विवस्त्र अल्पवयीन मुलीला घटनास्थळावरून शंभर फूट ओढत नेत दुसऱ्या शेतात होते.
सदर प्रकाराबाबत मृत मुलीच्या बहिणेने घडलेला प्रकाराबाबत गावात सांगितले. यानंतर घटना समोर आली. घटनेची माहिती मिळताच चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टेसह शहर पोलिस घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी तपास सुरु केला. जळगावहून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर विरवाडे -आडगाव रस्त्यावर संशयिताला अटक केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.