Jalgaon: १०८ रुग्णवाहिकेचा खोळंबा; महिलेची प्रकृती चिंताजनक

१०८ रुग्णवाहिकेचा खोळंबा; महिलेची प्रकृती चिंताजनक
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

अमळनेर (जळगाव) : प्रसूती कळा जाणवू लागल्याने नातेवाइकांनी १०८ रुग्णवाहिका मागविली. मात्र अमळनेरच्या १०८ रुग्णवाहिका न आल्‍याने (Doctor) डॉक्‍टरांनी पातोंडा येथील रुग्णवाहिका (Ambulance) मागविली. या सर्व प्रकारात अधिक वेळ लागल्‍याने प्रसुती कळांनी त्रस्‍त असलेल्‍या महिलेला अधिकच त्रास सहन करावा लागला. (Jalgaon News 108 Ambulance Issue)

Jalgaon News
Baramati: विद्युत तार तुटून पडली अंगावर; शेतात काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू

अमळनेर (Amalner) तालुक्यातील बोदर्डे येथील बानू रवींद्र भिल हिला प्रसूती कळा जाणवू लागल्याने नातेवाइकांनी १०८ रुग्णवाहिकेस पाचारण केले. (Jalgaon) अमळनेरच्या १०८ रुग्णवाहिकेला तांत्रिक अडचण आल्याने १०८ चे डॉ. वसीम राजा अन्सारी यांनी पातोंडा येथील १०८ रुग्णवाहिका मागवली. पातोंडा येथून रुग्णवाहिका मागवल्याने वेळ जास्त लागला. या दरम्यान बानूची प्रसूती बोदर्डे येथेच आशा स्वयंसेविकेच्या मदतीने झाली. मात्र प्रसूती दरम्यान गर्भावरण मधेच अडकल्याने तिला जास्त त्रास जाणवू लागला.

रुग्णालयात दाखलसाठीही फिराफिर

डॉ. अन्सारी यांनी जवळच्या मांडळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुढील उपचारासाठी नेले. मात्र तेथे डॉक्टर, वॉर्ड बॉय, परिचारिका कोणीच हजर नसल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला. बानूला त्रास वाढू लागल्याने अखेरीस १०८ ने पुन्हा त्या महिलेला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांच्या मदतीने तिचे गर्भावरण काढून टाकण्यात आले. महिला सुखरूप झाली. पण पुन्हा एकदा आरोग्य विभागावर प्रश्न उपस्थित झाले आहे.

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत आहे. संबंधित महिलेची प्रकृती चिंताग्रस्त असताना तिला ग्रामीण रुग्णालयात किंवा जिल्हा रुग्णालयात हलवणे क्रमप्राप्त असताना कुटुंबाने मात्र त्या महिलेला ‘पीएचसी’ला हलविले. आमचे काही कर्मचारी मांडळ पीएचसीला उपस्थित होते, त्यांनी मदत केली.

- डॉ. गिरीश गोसावी, तालुका वैद्यकीय अधिकारी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com