Jalgaon Accident : विरुद्ध दिशेने सुसाट वेगाने येत उडविले; दुचाकीच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी

Jalgaon News : सर्विस रोडवर विरुद्ध दिशेने भरधाव जाणाऱ्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात योगेश पाटील हे खाली पडल्याने यांच्या डोक्याला गंभीर दुखापत
Jalgaon Accident
Jalgaon AccidentSaam tv
Published On

जळगाव : जळगाव- भुसावळ दरम्यान चार पदरी झालेल्या महामार्गावरच्या सर्व्हिस रोडवर विरुद्ध दिशेने सुसाट वेगाने दुचाकी चालवत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे झालेल्या भीषण अपघातात बोदवड येथून जळगावकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघात नशिराबाद जवळील समांतर रस्त्यावर घडला. 

जळगाव- भुसावळ महामार्गावरील नशिराबाद येथे दुचाकींच्या झालेल्या अपघातात योगेश बळीराम पाटील (वय ५१) यांचा मृत्यू झाला. जळगाव शहरातील चैतन्यनगरात वास्तव्यास असलेले योगेश पाटील हे बोदवड न्यायालयात वरिष्ठ लिपीक म्हणून नोकरीला होते. तर त्यांची पत्नी लघुपाटबंधारे विभागात नोकरीस आहे. १ एप्रिलला सायंकाळी ड्यूटी आटोपल्यानंतर योगेश पाटील हे दुचाकीने जळगावकडे येण्यास निघाले होते. 

Jalgaon Accident
Chalisgaon Accident : गुढीपाडव्याला घेतली कार; परिवाराला घेऊन जाताना घडले दुर्दैवी, सात वर्षीय मुलाचा मृत्यू

डोक्याला मार लागल्याने मृत्यू 

याचवेळी जळगावकडून भुसावळकडे सर्विस रोडवर विरुद्ध दिशेने भरधाव जाणाऱ्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात योगेश पाटील हे खाली पडल्याने यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर धडक देणाऱ्या दुचाकीवरील मुस्तफा लतिफ खान (वय ६५) व बी. ओ. फर्नांडिस (वय ६१) दोघ गंभीर जखमी झाले. 

Jalgaon Accident
Nanded : जिवंत समाधी घेण्यासाठी शेतकऱ्याने शेतात खोदला खड्डा; कर्जमाफीच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका

दरम्यान महामार्गावर अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिकेला फोन केला. यानंतर तिन्ही जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना योगेश पाटील यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच योगेश पाटील यांच्या कुटुंबीयांसह नातेवाइकांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मृतदेह बघताच आई- वडिलांसह पत्नी व मुलांनी आक्रोश केला. तर दोन्ही जखमींवर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com