अहिंसा परमो धर्म: हा जैन धर्माचा मूलमंत्र..ज्या जैन मुनींनी आपल्या धर्मियांना अहिंसेचा मार्ग दाखवायला हवा..तेच जैन मुनी जाहीरपणे हत्येचं समर्थन करताय.. जैन मुनी निलेश चंद्र यांचं हे वक्तव्य पुन्हा एकदा एका....ते ही थेट नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणार राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्येबद्दलच विधान ..
धार्मिक व्यासपीठावरून शांतता आणि सद्भावनेचा संदेश देणं अपेक्षित असतं.. मात्र निलेश चंद्र यांनी आपल्या भाषणातून फाळणीचा संदर्भ देत गांधींच्या हत्येचं समर्थन केल्यानं आता नवा वाद पेटलाय..काँग्रेसनं ही विकृती असल्याचा पलटवार केलाय. तर दुसरीकडे जैन मुनी हिंसेचं समर्थन का करताय? असा सवाल तुषार गांधींनी उपस्थित केलाय..
जैन मुनी निलेश चंद्र आणि वाद हे आता समीकरणच बनलंय. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी वारंवार समाजात फूट पाडणारी विधानं करायची हा जणू त्यांचा अजेंडाच झालाय.. पण यावेळी जैन मुनींनी गोडसेची पाठराखण करून सर्व सीमा ओलांडल्यात.. धर्माच्या नावाखाली हिंसेचं बीज पेरणारे हे मुनी समाजाला कोणत्या दिशेला घेऊन जातायत? प्रशासन यांच्यावर गुन्हा दाखल करणार की पुन्हा एकदा 'धार्मिक भावना' जपण्याच्या नावाखाली याकडे दुर्लक्ष करणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.