उंदीर मारण्याचे औषध घालून पतीस दिला गुलाबजामुन; पत्नीस अटक, २ दिवसांची काेठडी

गौरीने माझी चूक झाली. माफ करा, मी पुन्हा असे करणार नाही अशी कबूली दिली.
court
courtSaam Tv
Published On

सांगली : पतीला जेवणाच्या डब्यातून खाद्य पदार्थातून विषारी औषध घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सांगली (sangli) जिल्ह्यातील वाळवा (walva) येथील गौरी प्रसन्ना खंकाळे हिच्या विरोधात इस्लामपूर (islampur) पोलीस (police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पती प्रसन्न खंकाळे यांनी इस्लामपूर पोलीस (islampur police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर पत्नी गौरी हिला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता तिला दोन दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (islampur latest marathi news)

पाेलिसांनी दिलेली माहिती अशी - १७ मार्च राेजी गौरी प्रसन्न खंकाळे हिने पती प्रसन्न यांच्या जेवणाच्या डब्यात फिनेल घातले होते. त्यानंतर चार दिवसांनी पुन्हा चहामध्ये फिनेल घातले. त्यानंतर सोमवारी चार (एप्रिलला) गौरीने सकाळी साडेनऊच्या वाजण्याच्या सुमारास प्रसन्ना यांना गुलाबजामुन खायला दिले. प्रसन्न यांना त्यात बुरशी औषधाचे तुकडे दिसले. तिने गुलाब जामुन खाण्याचा खूपच आग्रह धरला. त्यावरून प्रसन्न यांना शंका आली. त्याने ते खाल्ले नाही. गुलाबजामुन मधून उंदीर मारण्याचे औषध घालण्यात आले होते. त्यावर त्यांनी तिला हे काय आहे असे विचारल्यावर तिने चुकीची कबुली दिली.

court
Sangli: चांदाेली धरणात पूरेसा पाणीसाठा; सांगलीकरांना टंचाईच्या झळा बसणार नाहीत

गौरीने माझी चूक झाली. माफ करा मी पुन्हा असे करणार नाही असे म्हणाले त्यावरून हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान पतीच्या फिर्यादीनंतर पाेलिसांनी तिच्यावर कमल ३०७ आणि ३२८ नुसार इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन न्यायालयात (court) हजर केले.

Edited By : Siddharth Latkar

court
Maharashtra Kesari: साता-यात आजपासून रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
court
नगरचे LCB अधिकारी बनले मजूर; पाच जिल्ह्यांतील Wanted गुन्हेगारास रत्नागिरीत अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com