Sangli: चांदाेली धरणात पूरेसा पाणीसाठा; सांगलीकरांना टंचाईच्या झळा बसणार नाहीत

धरण व्यवस्थापनाने अंदाज घेऊन टंचाई भासणार नाही आणि धरण तळ ही गाठणार नाही असे नियोजन केले आहे.
chandoli dam (file photo)
chandoli dam (file photo)saam tv (file photo)
Published On

सांगली : सांगलीच्या (sangli) चांदोली धरणात (chandoli dam) सध्या 20.14 टीएमसी पाणीसाठा (water storage) शिल्लक आहे. त्यामुळे गत वर्षाच्या तुलनेत यंदा 1.08 टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. सध्याचा धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचा विचार करता पुढील हंगामात पावसाचे उशिरा आगमन झाले तरी पाणी टंचाई भासणार नाही असे चित्र आहे. (sangli latest marathi news)

चांदोली धरणाची साठवण क्षमता 34.40 टीएमसी आहे. हे धरण दरवर्षी धरण शंभर टक्के भरते. यंदा देखील भरले हाेते. सध्या धरणात 20.14 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या धरणाची पातळी 610. 50 मीटर इतकी आहे. सध्या धरणाच्या पायथ्याशी वीज ग्रहातून 1 हजार 475 पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात सुरू आहे.

chandoli dam (file photo)
Navi Mumbai Breaking News: महापे एमआयडीसीत लागली आग; अग्निशमन दल दाखल

यंदा ऑक्‍टोबर ते मार्च या कालावधीत 14.26 टीएमसी पाणीसाठा संपला आहे. यावरून प्रत्येक महिन्याला साधारण 2.5 टक्के पाण्याचा वापर होत असल्याचे स्पष्ट होते. आता उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे महिन्याला तीन टीएमसी पाणी सोडले तरी पाणी धरणात कमीत कमी 14 टीएमसी पाणी शिल्लक राहण्याची शक्यता आहे. धरण व्यवस्थापनाने अंदाज घेऊन टंचाई भासणार नाही आणि धरण तळ ही गाठणार नाही असे नियोजन केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

chandoli dam (file photo)
Bagad: नागनाथ देवाच्या यात्रेतील लाकडी बगाड पळविण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
chandoli dam (file photo)
Sangli: अवकाळी वादळी-वाऱ्यासह झालेल्या पावसाने घराची भिंत कोसळली, वयोवृद्धाचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com