सांगली: सांगली (Sangli) जिल्ह्यामध्ये काल अवकाळी पाऊस पडला. तर कवठेमहांकाळ तालुक्यात वादळी-वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यावेळी ढालगावच्या घोरपडी येथील एका घराची भिंत कोसळली. यामध्ये एका वृद्धाचा मृत्यू झालाय.
महादेव टेंगले (वय 75) असं या वयोवृद्धाचं नाव आहे. तर अनेकांच्या घरावरील पत्रे सुद्धा उडाली आहेत. त्यामुळे चार ते पाच जण जखमी झाले आहेत. शासनाकडून मदतीची अपेक्षा या लोकांकडून केली जात आहे.
काल दिवसभर उन्हाचा तडाखा जरा जास्तच प्रमाणात होता. तापमान चाळीस अंशांच्या वर गेले होते. त्यातच काल सायंकाळच्या सुमारास वादळी-वाऱ्यासह पाऊस (Rain) सुरु झाला. उघड्यावर असलेली वैरणे उडाल्याने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. तर घोरपडी येथील महादेव टेंगले यांच्या घराची भिंत कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अवकाळी वादळी-वारा पावसाने बेदाणा शेडचे पत्रे उडाले
तर घोरपडी येथील अवकाळी वादळीवारा पावसाने बेदाणा शेडचे पत्रे उडून गेले आहेत. यामध्ये शेड आणि बेदाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि शेडमध्ये काम करणाऱ्या चार महिला जखमी झाल्या आहेत. शासनाने मदत करावी अशी मागणी शेड मालकांनी केली आहे.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.