Arrest
ArrestSaam Tv

नगरचे LCB अधिकारी बनले मजूर; पाच जिल्ह्यांतील Wanted गुन्हेगारास रत्नागिरीत अटक

लाल रंगाच्या दगडाच्या खाणीत संदिप्या मजूर म्हणून काम करत हाेता.
Published on

नगर : अहमदनगर (nagar), बीड (beed) व पुणे (pune) जिल्ह्यातील तीन मोक्का गुन्ह्यात तसेच सातारा (satara), औरंगाबादसह (aurangabad) पाच जिल्ह्यातील इतर 23 अशा एकूण 26 गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या (lcb) पथकास जेर बंद करण्यात यश आले आहे. गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाल्यानंतर संशयित आरोपी संदीप उर्फ संदिप्या भोसले याच्या पाेलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. (nagar latest marathi news)

संदीप उर्फ संदिप्या भोसले हा रत्नागिरी परिसरात नाव बदलून रहात आहे. ताे लाल रंगाचे दगडाच्या खाणीत मजूर म्हणून काम करत आहे अशी माहिती एलसीबीला मिळाली. त्यानूसार स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी वेषांतर करून खाणीत ट्रक ड्रायव्हर व मजूर म्हणून कामगारांसोबत तीन दिवस मुक्कामी राहून काम केले.

Arrest
Maharashtra Kesari: साता-यात आजपासून रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

ज्या ठिकाणी संदिप्या राहत हाेता त्याठिकाणी एलसीबीने छापा घालताच ताे पळून जाऊ लागला. एलसीबीचे पथक देखील त्याच्या पाठीमागे धावले. सुमारे तीन किलोमीटरचा पाठलाग करून त्यांनी संदिप्याला ताब्यात घेतले.

संदीप उर्फ संदिप्या ईश्वर भोसले याला पारनेर पोलिस ठाण्यात हजर केले. त्यानंतर त्याने गुन्ह्यांची कबूली दिल्याची माहिती (मनोज पाटील, पोलिस अधीक्षक, अहमदनगर) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Arrest
Bank Of Maharashtra चं एटीएम मशीन पळविलं; चाेरट्यांचा तपास सुुरु
Arrest
Akola: सरकारवर बच्चू कडू नाराज; खदखद केव्हाही बाहेर पडेल दिला इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com