

रेल्वेचा नियम बदलला
प्रवाशांसाचा प्रवास सोपा होणार आहे
वेटिंग तिकीटामध्ये आता बदल होणार आहे
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवास प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेच्या तिकीट बुकींगमध्ये महत्वाचा बदल होणार आहे. भारतीय रेल्वेने रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ऑनलाइन वेटिंग तिकीटांची सुविधा केली. पण त्यातही अनेक प्रवाशांना अडचणी आल्या.
ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये किंवा सुट्यांमध्ये प्रवासी ऑनलाइन तिकीटं बुक करतात, पण चार्ट तयार झाल्यानंतरही तिकीट वेटिंगमध्ये राहिल्यावर ते आपोआप रद्द होतं. त्यामुळे प्रवाशांना परत जनरल तिकीट काढून प्रवास करावा लागतो. आता ही समस्या दूर करण्यासाठी रेल्वे मंत्रालय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर येत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे मंत्रालय ऑनलाइन बुक केलेल्या वेटिंग तिकिटांवरचा ऑटो - कॅन्सलेशनचा नियम रद्द करण्याचा विचार करत आहे. हा निर्णय लागू झाला तर चार्ट तयार झाल्यानंतरही वेटिंगमध्ये राहिलेले ऑनलाइन तिकीट वैध राहील. अशा परिस्थितीत प्रवाशांना त्याच डिजिटल तिकिटाचा वापर करून जनरल डब्यात प्रवास करण्याची परवानगी मिळू शकते.
रेल्वेच्या नियमानुसार, आरक्षित तिकीट ऑनलाइन बुक करून ठेवलं असेल आणि चार्ट तयार झाल्यानंतर ते वेटिंगमध्येच राहिलं तर ते आपोआप रद्द केलं जातं. त्यानंतर टॅक्स आणि इतर शुल्क त्यातून वजा करून उरलेली रक्कम प्रवाशाच्या खात्यात परत केली जाते. पण रेल्वेच्या आरक्षण खिडकीतून घेतलेल्या वेटिंग तिकिटांवर प्रवाशांना जनरल डब्यात प्रवास करण्याची परवानगी असते.
भारतीय रेल्वेच्या एकूण तिकिटांपैकी ८५ टक्के तिकीटे ऑनलाइनच बूक केली जातात. त्यामुळे मोठ्या संख्येने प्रवाशांना या बदलाचा फायदा होऊ शकतो. वेटिंग तिकीटामुळे प्रवास रद्द करावा लागणाऱ्या किंवा पुन्हा स्वतंत्र जनरल तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय दिलासायक ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.