
निपाणी (प्रतिनिधी): कोल्हापूरपासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाटकमधील निपाणी तालुक्यातील आडी गावात RCB चा विजय मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी रात्री झालेल्या सामन्यात RCB ने जबरदस्त कामगिरी करत विजयी झेंडा फडकावला आणि या विजयाचं उत्सवमय रूप आडी गावात पाहायला मिळालं.
सिद्धेश्वर मठाजवळ गावकऱ्यांनी खास व्यवस्था करत मोठी LED स्क्रीन लावली होती. संपूर्ण सामन्यादरम्यान गावकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. प्रत्येक चौकार-षटकारावर जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात गावात उत्सवाचं वातावरण निर्माण झालं.
RCB चा विजय निश्चित होताच गावकऱ्यांनी एकमेकांना पेढे वाटून आनंद साजरा केला. विशेष म्हणजे या आयोजनामध्ये स्थानिक युवकांचा मोठा सहभाग होता. दरम्यान, लाल-पिवळा झेंडा हातात घेऊन गावातून तरुणांनी बाईक रॅली काढली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा विजय साजरा केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आयपीएल २०२५ ची ट्रॉफी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकली आहे. २००८ पासून आता आरसीबीने विजेतेपद पटकावले आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्त्वात बंगळुरूच्या संघाने इतिहास रचला आहे. या विजयामुळे आरसीबीच्या चाहत्यांमध्ये आनंद-उत्साह पाहायला मिळत आहे. सामना जिंकल्यानंतर अनेक ठिकाणी जल्लोष होत असल्याचे पाहायला मिळाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.