
परिस्थिती कितीही वाईट असली तरीही त्यावर मात करण्याची ताकद असायला हवी. प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर एखादा व्यक्ती काहीही करु शकतो. याचाच एक उदाहरण म्हणजे पाथर्डी येथील देविचंज रामभाऊ कांबळे. त्यांचा एक हात एका अपघातात त्यांना कायमचा गमवावा लागतो. अशा परिस्थितीतही एका हाताने दुचाकी चालवत ते आईस्क्रिमचा व्यवसाय करतात.
पाथर्डी येथील देविचंद रामभाऊ कांबळे याचा साखर कारखान्यावर काम करताना मशीनमध्ये उजवा हात अडकल्याने कायमचे अपंगत्व आले. मात्र, यावर जिद्दीने मात करत तो एका हाताने दुचाकी चालवत खेड्यापाड्यात आईस्क्रिम विकण्याचा व्यवसाय करत आहे. तुटलेल्या हाताच्या खांद्याला कापडाची एक गाठ व दुसरी गाठ दुचाकीच्या एक्सलेटरला लावून दुचाकी चालवत कुटुंब चालवण्याची धडपड हा कौतुकाचा विषय ठरत आहे.
घरात वृद्ध आई-वडील पत्नी व दोन मुलांचे जबाबदारी असल्यामुळे शेती नसल्याने मिळेल ते काम करून तो कुटुंबाचा गाडा हाकत आहे. लोकांच्या शेतात जाऊन नांगरणी करणे, व्यापारी व शेतकऱ्यांचा कांदा अहिल्यानगर व पुणे येथील मार्केटमध्ये घेऊन जाणे, ऊसतोड मजूर म्हणून काम करणे, उन्हाळ्यात गारीगार विकणे, अशी कामे करत त्याने आपला उदरनिर्वाह सुरू ठेवला आहे.
दुचाकीवर सकाळी सात वाजता तो घराबाहेर पडतो बर्फाच्या कारखान्यावर जाऊन दुचाकीच्या मागे लावलेल्या बर्फाच्या पेटीत गारीगार, आईस्क्रिम, चोकोबार ठेवून तो खेड्यापाड्यात जाऊन त्याची विक्री करतो. तीस किलो वजनाची पेटी, दुचाकींचा भार तो सहज पेलतो. दुचाकींचा वेग कमी व जास्त सहजपणे करतो. हात गमावल्यानंतर हे त्याने न डगमगता कापडाच्या सहाय्याने आपला हात बनवून कापडच त्याच्या घराचा आधार बनला आहे असे म्हणता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.