Inspiring Story: दिव्यांग कलावंत राशीच्या स्वप्नांना मिळणार भरारी; शिक्षणाचे स्वीकारले पालकत्व!

Inspiring Story Rashi Patil : भुसावळच्या दिव्यांग कलाकार राशी पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊ. कला, संगीत आणि अभिनयातील प्रतिभेमुळे त्यांना शिक्षणासाठी समाजसेवक आणि स्वयंसेवी संस्थांकडून पाठिंबा मिळाला आहे.
Inspiring Story Rashi Patil  :
Divyang artist Rashi Patil receives educational support as her talent in art, music, and acting earns recognition in Bhusawal.saam tv
Published On
Summary
  • भुसावळच्या दिव्यांग कलाकार राशी पाटीलची प्रेरणादायी कथा

  • प्रा. उत्तम सुरवाडे यांनी शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली

  • स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मदतीचा हात

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील दिव्यांग हरहुन्नरी कलावंत चित्रकार राशी प्रवीण पाटील हिच्या शिक्षणाचे पालकत्व स्वीकारण्यात आले आहे. दिव्यांग असूनही आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कला ,संगीत, अभिनय ,चित्रकला या क्षेत्रात सर्वांना अचंबित करणारी करणारी राशी पाटील हिचे पालकत्व स्वीकारून शिक्षणाची जबाबदारी प्रा. उत्तम सुरवाडे यांनी घेतली आहे. मुके, आंधळे अपंग बालक...समाज व्हावा त्यांचा पालक! या भावनेतून स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जबाबदारी स्वीकारल्याचे सुरवाडे यांनी भाग्यवेद अकॅडमीच्या कार्यक्रमात सांगितले.

Inspiring Story Rashi Patil  :
Mukhyamantri Rajshree Yojana: मुलींच्या जन्मापासून मिळणार ₹५०,०००; काय आहे सरकारची योजना, कोणाला मिळणार लाभ?

यावेळी अभिनेत्री भावना गायकवाड उपस्थित होती. याप्रसंगी नगराध्यक्ष सुनील काळे, जिल्हाप्रमुख समाधान राजेंद्र चौधरी, राजेश्वरी निळे, नारायण निळे, नाशिकेत नेमाडे, राशीचे वडील प्रवीण पाटील, आई निशा पाटील आदी उपस्थित होते.

Inspiring Story Rashi Patil  :
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार? एकाचवेळी ३००० येणार? महत्त्वाची तारीख आली समोर

राशीला अपंगत्व आलं कसं?

राशीची कहाणी मनाला सुन्न करणारी आहे. अवघ्या तीन वर्षाची असताना डॉक्टरांच्या चुकीच्या ट्रीटमेंट दिल्या गेल्यामुळे आयुष्यच पार बदलून गेलं. होत्याचं नव्हतं झालं. कायमचं अपंगत्व आलं. वाट्याला आली आयुष्यभर व्हीलचेअर! तिचे आता हातपाय काम करत नाही. म्हणून ओठांनी मोबाईल ऑपरेट, जिभेने लॅपटॉप ऑपरेट करते. जीभेने पियानो वाजवते. तोंडात कुंचला (ब्रश)पकडून अप्रतिम चित्र साकारते. तिने साकारलेल्या अनेक चित्रांना पारितोषिक, मान्यवरांचे दाद मिळाली आहे. तिने शिकत असलेल्या सप्त ललित कला भवन मध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावलाय.

अवघ्या वयाच्या 18 व्या वर्षी तिला "खान्देश आयकॉन आणि तेजस्विनी" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कलाप्रेमी, छायाचित्रकार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून त्यांना त्यांची छायाचित्र भेट देण्याची इच्छा तिने बोलून दाखवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com