आपल्या हटके शैलीतील कीर्तनातून समाजप्रबोधन करतानाच राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर चौफेर फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध असणारे ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर पुन्हा एकदा आपल्या एका विधानामुळे चर्चेत आलेत...माढा तालुक्यातील अंजनगावमध्ये कीर्तनात बोलताना इंदुरीकर महाराजांनी राजकीय नेत्यांच्या निवृत्तीच्या मुद्द्यावर थेट बोट ठेवलयं..."पुढाऱ्यांनी वयाच्या 60 व्या वर्षी राजकारणातून थेट राजीनामाच दिला पाहिजे," असा रोखठोक सल्लाही इंदुरीकरांनी दिलाय...इंदुरीकर महाराज काय म्हणाले ऐका...
दरम्यान वय वाढेल तशी माणसाची बौद्धिक पातळी कमी होते, पण आपले पुढारी वय वाढेल तसे जास्तच वेड्यासारखे वागू लागतात, असं वादग्रस्त विधानही इंदुरीकरांनी केलयं...त्यामुळे इंदुरीकरांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद पेटण्याची दाट शक्यता निर्माण झालीय...सध्या राष्ट्रीय राजकारणापासून ते महाराष्ट्राच्या राजकारणात 70 ते 80 वयोगटातील अनेक दिग्गज नेते सक्रिय असून, सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत. पक्षातील उमेदवारीपासून ते मुख्य पदांपर्यंत ज्येष्ठ नेत्यांचाच वरचष्मा पाहायला मिळतो.
अशा पार्श्वभूमीवर इंदुरीकर महाराजांनी थेट 'साठीत निवृत्तीचा सल्ला दिल्यानं राज्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराजांचे हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय. 'इंदुरीकर महाराजांचा टोला नेमका कुणाला?' यावरून आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जातायत...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.