सरकारची निर्यात बंदी, साखर उद्योग अडचणीत, 3 महिन्यांतच फिरवला निर्यातीचा निर्णय

India Sugar Export Ban Impact On Farmers And Mills: केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतलाय. मात्र अवघ्या तीन महिन्यांपूर्वी निर्यातीचा कोटा वाढवणाऱ्या सरकारने आता अचानक असा यू-टर्न का घेतला? केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यातील साखर उद्योगाला कसा फटका बसणार आहे?
Sugarcane farmers and mills in Maharashtra face uncertainty after the central government’s sudden ban on sugar exports.
Sugarcane farmers and mills in Maharashtra face uncertainty after the central government’s sudden ban on sugar exports.saam tv
Published On

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कवडीमोल भाव मिळत असतानाच आता साखर उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलंय. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर तात्काळ बंदी लागू केलीये. 30 सप्टेंबरपर्यंत लावण्य़ात आलेल्या या बंदीचा फटका आता देशभरातील साखर उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. केंद्र सरकारनं साखर निर्यात बंदीचा निर्णय का घेतलाय पाहूयात..

साखर निर्यात बंदीचा निर्णय का?

साखर निर्यात बंदीच्या माध्यमातून स्थानिक बाजारपेठेतील दरवाढ रोखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तसंच, देशांतर्गत टंचाई भासू नये म्हणून साठवणूक आणि पुरवठा सरकार वाढवणार आहे. जागतिक दरवाढ आणि स्थानिक मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय. इतकंच नव्हे तर आता साखरेचा समावेश 'निर्बंधात्मक' ऐवजी 'प्रतिबंधित' श्रेणीत करण्यात आलाय. तसंच, अमेरिका, युरोपियन युनियन आणि सरकार ते सरकार अंतर्गत होणारी निर्यात सुरू राहणार आहे. तर आधीच ठरलेली निर्यात यातून वगळण्यात आलीय.

केंद्र सरकारच्या साखर निर्यात बंदीचा मोठा फटका महाराष्ट्रातील शेतकरी आणि साखर कारखान्यांना बसणार आहे. त्य़ामुळे शेतकरी नेते चांगलेच आक्रमक झाले असून साखर निर्यातबंदीचा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी केलीय. इतकचं नव्हे तर कारखानदारांचे आर्थिक गणित कोलमडून शेतकऱ्यांची एफआरपी(FRP) रखडणार आहे. आणि थकबाकीदेखील वाढण्याची चिन्हे आहेत.

तीन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं साखर निर्यातीचा कोटा 5 लाख टनाने वाढवला होता. इतकंच नव्हे तर देशातील साखर उत्पादन चांगले असल्याचा दावा करत सरकारने याच कोट्यात पुन्हा 87 हजार टनांची वाढ केली होती.

मात्र तीन महिन्यांतच साखरेच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळे कारखाने आणि शेतकरी दोन्हीही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com