Maharashtra Budget: कोरोना, महापूर आदी संकट काळामध्ये शासन जनतेच्या नेहमी पाठिशी- अजित पवार

महाविकास आघाडी सरकारकडून आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.
Maharashtra Budget 2022 News Updates
Maharashtra Budget 2022 News UpdatesSaamTv
Published On

मुंबई: महाविकास आघाडी सरकारकडून आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत विकासासंदर्भात काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच सामान्य माणसांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.

हे देखील पहा-

कोरोना, महापूर आदी संकट काळात शासन जनतेच्या पाठिशी उभं राहिलं आहे. कोरोना, महापूर आदी संकटामध्ये शासन जनतेच्या पाठिशी उभे राहिले आहे. २१- २२ राज्य आपत्ती निवारण प्रतिसाद निधीमधून कोविड कर्तव्यावर असताना निधन झालेल्या व्यक्तींच्या वारसांना ५०हजार मिळणार आहेत. कोरोनाने जीव गमावलेल्या वय्क्तींच्या नातेवाईकांना ५० हजार रुपयांची मदत मिळणार आहे. ५०३ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात येणार आहे. पीक नुकसानी साठी ५ हजार ५४४ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. रायगड आणि तोक्ते चक्रीवादळ काळामध्ये ६ हजार ६३९ कोटी रुपयांची मदत आली आहे.

Maharashtra Budget 2022 News Updates
Mahatrashtra Budget 2022: एसटी महामंडळाला ३ हजार नवीन बसेस देणार- अजित पवार

अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या इतर महत्त्वाच्या घोषणा आहेत. नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. १ लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे क्षेत्र आणि ६० हजार कृषीपंपांना वीजजोडणी देण्यात येणार आहे. पीक कर्ज वाटपामध्ये वाढ करण्यात येणार आहे. पुढील २ वर्षामध्ये १०४ सिंचन प्रकल्प पूर्ण करणार आहेत. कोकण आणि परभणी विद्यापीठाला ५० कोटी रुपये देण्यात येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com