मुंबई: महाविकास आघाडी सरकारकडून आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत विकासासंदर्भात काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच सामान्य माणसांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.
हे देखील पहा-
एसटी महामंडळाला (ST Corporation) ३ हजार नवीन बसेस देणार आहेत. एस्टी महामंडळ वेतन साठी ४१०७ कोटी दिले आहेत. ३००० पर्यावरण पूरक नवीन बस गाड्या उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. एसटी लवकरच सुरु होणार आहे.महिला शेतकऱ्यांसाठी (farmers) कृषी योजनांमध्ये राखीव असलेली 30 टक्केची तरतूद आता वाढवून 50 टक्के केलेली आहे. वाहतूक व दळणवळण विकासासाठी शासनाकडून भरघोस निधी देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सात हजार पाचशे कोटीच्या 10 हजार किमीच्या ग्रामीण रस्त्यांना मंजुरी देण्यात आली असल्याचं पवार म्हणाले. पंतप्रधान ग्रामसडक योजना टप्पा 3, रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाची घोषणा करण्यात आली आहे. सागरी महामार्गासाठी 500 कोटी, पुणे रिंगरोडसाठी 1500 कोटी देण्यात आले आहेत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.