Budget: शेतकऱ्यांसाठी ५०हजारऐवजी ७५ हजार अनुदान- अजित पवार

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
अजित पवार
अजित पवार Saam Tv
Published On

मुंबई - आज महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) सादर केला जात आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ५ राज्यात विधानसभा (Assembly) निवडणुकीचे निकाल नुकतेच लागले आहेत. या ५ राज्यामध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. ५ पैकी ४ राज्यामध्ये भाजपाने बाजी मारली आहे. तर दुसरीकडे पुढील काळात राज्यातल्या अनेक शहरातील महापालिकांच्या निवडणुका देखील होणार आहेत. (75000 subsidy for farmers instead of 50000)

हे देखील पहा-

या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी (farmers) महत्त्वाच्या घोषणा करताना अजित पवार म्हणाले की, नियमितपणे कर्जफेक करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा २०२० मध्ये करण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या संकटाने त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नव्हती. मात्र, आता २०२२-२३ च्या आर्थिक वर्षांत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले आहे.

अजित पवार
Beed: युक्रेनमध्ये एक दिवस कॉलेज करून बीडचा विद्यार्थी अखेर परतला..!

अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या इतर महत्त्वाच्या घोषणा आहेत. नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. १ लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे क्षेत्र आणि ६० हजार कृषीपंपांना वीजजोडणी देण्यात येणार आहे. पीक कर्ज वाटपामध्ये वाढ करण्यात येणार आहे. पुढील २ वर्षामध्ये १०४ सिंचन प्रकल्प पूर्ण करणार आहेत. कोकण आणि परभणी विद्यापीठाला ५० कोटी रुपये देण्यात येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com