

Gondia News Today: गोंदिया जिल्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगाव-बांध, गोठणगाव, केशोरी या भागाच्या परिसरातील जंगलामध्ये हत्तीचा कळप मागील सहा महिन्यापासून वास्तव्याला आहे. यापूर्वी या हत्तींच्या कळपाने शेतकऱ्यांच्या धानाचे आणि नागणडोह गावात जाऊन घरांचे नुकसान तसेच एका ईसमास ठार केल्याच्या घटना घडल्या होत्या. (Latest Marathi News)
मात्र सध्या गोंदिया (Gondia) जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाचे भात रोवणीचे जोमात काम सुरू आहे. अनेक शेतकरी आपल्या शेतावर काम करीत असतात आणि अशातच अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या केशोरी भागातील मौजा राजोली, शिवरामटोला येथील जंगलामध्ये असलेला हत्तींचा कळप हा शेतातून गेल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेल्या भात पिकांच्या पऱ्ह्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यात 12 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
मागील आठवड्यात मौजा उमरपायली येथिल शेतकऱ्यांचे पऱ्हे पायांनी तुडवत नुकसान केले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. भात पिकांच्या पऱ्ह्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आता नुकसान भरपाईची मागणी केली आहे. (Elephant News)
शेतकरी शेतात मजूर लावून धान पिकाची रोवणी करीत असतात आणि या उभ्या पिकांवर हत्तींचा कळप चालत गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नाशधुश झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी वनविभागाकडे होत आहे. या नुकसानीचे गोठणगाव वन विभागाने तात्काळ पंचनामे करुन असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी या करिता वन परिक्षेत्र अधिकारी विजय तेलंग यांंच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहायक आर.एम पारीसे यांनी नुकसानीचे पंचनामे करित पुढील कारवाई सुरु केलेली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.