अंबरनाथमध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या १५० सायलेन्सर आणि ५० हॉर्न ताब्यात
अंबरनाथमध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या १५० सायलेन्सर आणि ५० हॉर्न ताब्यातअजय दुधाणे

अंबरनाथमध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या १५० सायलेन्सर आणि ५० हॉर्न ताब्यात

कोरोना काळात कर्णकर्कश आवाज करीत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहतूक विभागाने १५० मॉडीफायर सायलेन्सर असणाऱ्या बुलेट आणि कर्णकर्कश आवाज करणाऱ्या ५० हॉर्नवर कारवाई करत त्यावर सायलेन्सर आणि हॉर्नवर रोडरोलर फिरवण्यात आला आहे.
Published on

उल्हासनगर - कोरोना Corona काळात कर्णकर्कश आवाज करीत ध्वनी प्रदूषण Sound pollutionकरणाऱ्या वाहतूक विभागाने १५० मॉडीफायर सायलेन्सर असणाऱ्या बुलेट आणि कर्णकर्कश आवाज करणाऱ्या ५० हॉर्नवर Horn कारवाई करत त्यावर सायलेन्सर आणि हॉर्नवर रोडरोलर फिरवण्यात आला आहे. अंबरनाथ - बदलापूर Badlapur शहरातील वाहतूक पोलीस विभागातर्फे कर्णकर्कश आवाज करीत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर परिसरात विशेष कारवाईचे आयोजन करून एकुण १५० मॉडीफाय सायलेन्सर आणि ५० हॉर्न ताब्यात घेण्यात आले.

हे देखील पहा -

ताब्यात घेतलेले सायलेन्सर मॉडीफाईड असल्याबाबत आर.टी.ओ. यांचेकडून खात्री करून सदरचे मॉडीफाईड सायलेन्सर हे बेकायदेशीर असल्याने त्याचा परत कोणाकडून वापर होऊ नये याकरीता ते आज अंबरनाथ मधील साईबाबा मंदिरासमोरील कल्याण बदलापूर रोडवर मांडुन त्यावर रोलर फिरविण्यात आला.यापुढेही अशी कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी म्हटले आहे.

अंबरनाथमध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या १५० सायलेन्सर आणि ५० हॉर्न ताब्यात
भाजप आमदारांच्या निलंबनाचे बीड मध्ये पडसाद...

सायलेन्सर मध्ये मॉडिफिकेशन करून चित्र विचीत्र आवाज काढत शहरामध्ये बुलेट आणि बाईक फिरत असत त्यांचे अशा वागण्यामुळे ध्वनिप्रदुषन होत असुन कर्णकर्कश आवाजामुळे सामान्य जनता त्यात विशेष करून वयोवृध्द नागरीक, रूग्ण, विद्यार्थी यांना प्रचंड प्रमाणात त्रास होत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com