विनोद जिरे
बीड - अधिवेशनामध्ये गोंधळ घातल्याच्या आरोपावरून 12 भाजप BJP आमदारांना निलंबित केल्यानंतर भाजप राज्यभर आक्रमक झाले आहे. याचे पडसाद आज बीडमध्ये Beed उमटले. बीड भाजपच्या वतीने महाविकास आघाडीच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून, या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. BJP MLAs suspension reverberates in Beed
हे देखील पहा -
सरकार ओबीसीचा OBC आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असून सामान्यांचे प्रश्न मांडले म्हणून या बारा आमदाराचे निलंबन केले गेले आहे. असा आरोप देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान हे निलंबन मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे. विधानसभेत गैरकृत्य केल्याचा ठपका ठेवत भाजपच्या बारा आमदारांना एक वर्षासाठी निलंबनाची कारवाई केली.
या कारवाईनंतर याचे पडसाद वसईत उमटण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांना ओबीसी OBC आरक्षणावर बोलू दिले नाही. या गोंधळातच ओबीसी आरक्षणाचा इम्पेरील डेटा केंद्र सरकारकडून Central Government मिळावा, याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. या मुद्द्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षात चांगलीच शाब्दिक चकमक झाली. दरम्यान, अशी धक्काबुक्की झाली नसल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.