भाजप कार्यकर्त्यांचे औसा इथं निदर्शने, ठाकरे सरकार विरुद्ध मोठा असंतोष

काल विधिमंडळात भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षांसाठी निलंबन केल्याने राज्यात गदारोळ माजला आहे. याचे पडसाद औसा इथे सुद्धा उमटले आहेत.
भाजपा कार्यकर्त्यांचे औसा इथं निदर्शने, ठाकरे सरकार विरुद्ध मोठा असंतोष
भाजपा कार्यकर्त्यांचे औसा इथं निदर्शने, ठाकरे सरकार विरुद्ध मोठा असंतोषSaam Tv
Published On

लातूर - काल विधिमंडळात भाजपच्या BJP 12 आमदारांचे एक वर्षांसाठी निलंबन केल्याने राज्यात गदारोळ माजला आहे. याचे पडसाद औसा Ausa इथे सुद्धा उमटले आहेत. औसा येथील भाजप आमदार अभिमन्यू पवार Abhimanyu Pawar यांना सुध्दा निलंबित करण्यात आले आहे. यावर औसा शहरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी औसा तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली होती. BJP workers protest

ओबीसी आरक्षणाचा OBC Rresrvation प्रश्नावर भाजपचे विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांना बोलू दिले नाही. म्हणून त्याचा जाब विचारत असताना औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह 12 आमदारांना एक वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे यावर औसा इथं भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांत मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

आज औसा इथं भाजपच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांनी अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवण्याचे तंत्र उध्दवा नाही चालणार तुझं षडयंत्र , महाविनाश आघाडीचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. BJP workers protest

हे देखील पहा -

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेकदा सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला अडचणीत आणण्यासाठी हेतुपुरस्सर 12 आमदार निलंबित करण्यात आले आहे. भाजपचा आवाज दाबण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. राज्यातील ओबीसी समुदायाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले असले तरी महाविकास आघाडी सरकार ढिम्म बसून आहे. त्यांना ओबीसींना हक्क द्यायचे नाहीत.

भाजपा कार्यकर्त्यांचे औसा इथं निदर्शने, ठाकरे सरकार विरुद्ध मोठा असंतोष
धरणगावात आढळले दोन शिलालेख; ऑक्सिजन प्‍लांटच्‍या खोदकामात शोध

यामुळे आज ओबीसी हिताचा खोटारडा आव आणला आहे पण प्रत्यक्षात ओबीसींच्या आवाजाची मुस्कटदाबी करण्याचे कारस्थान सरकार करत आहे. यामुळे सभागृहात चर्चेची तयारी दाखविणार्‍या भाजपच्या बारा आमदारांना निलंबीत करण्यात आले आहे. भाजपच्या आमदारांनी नव्हे तर महाविकास आघाडीच्या आमदाराने असभ्य वर्तन केल्याचे सर्वांनी पाहिले असून याचे सीसीटिव्ही फुटेज सरकारने तपासण्याची गरज आहे. BJP workers protest

मात्र आपल्या आमदारावर कारवाई करायचे सोडून भाजपच्या आमदारांचे निलंबन करण्याचा नालायकपणा या सरकारने केला आहे. याचाच अर्थ या सरकारला ओबीसींच्या हिताशी काही देणेघेणे नाही. भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांमुळे सरकार बदनाम झाले असून सभागृहात आपली कोंडी होऊ नये म्हणून भाजपचे १२ आमदार निलंबीत करून विरोधी पक्षाचे संख्याबळ कमी करण्याचे कारस्थान रचला आहे असा आरोप यावेळी भाजपा नेते संतोषप्पा मुक्ता यांनी केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com