संतापजनक! नराधम बापाचा पोटच्या मुलीवर बलात्कार; 'त्या' घटनेमुळे झाला उघड

बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यात घडली आहे.
Akola Crime News
Akola Crime Newsजयेश गावंडे
Published On

अकोला : बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अकोल्यातील (Akola) मूर्तिजापूर तालुक्यात घडली आहे. एका वासनांध बापाने स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार करत, तिला गर्भवती केल्याची संतापजनक घटना शेलू वेताळ शिवारात घडली आहे. या प्रकरणी मुर्तीजापुर ग्रामीण पोलिसांनी (Murtijapur Rural Police) आरोपी नराधम बापाला अटक केली आहे.

शेलू वेताळ येथील एका शेतात मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बैतूल जिल्ह्यातील कोथूलकुंड येथील एक कुटुंब शेतीत मजुरीचे काम व शेतीची राखण करण्यासाठी आले होते. शेतातील झोपडीत या कुटुंबाचे वास्तव होते. याच कुटुंबातील एका बापाने आपल्या अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान, या घटनेबाबत कुठे वाच्यता केल्यास पित्याकडून मुलीला वारंवार धमकावले जात होते. भीतीपोटी पीडित मुलीने तिच्यावर घडलेल्या अत्याचाराबाबत कोणालाही काही सांगितले नाही. दरम्यान ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर पीडितेने मुर्तीजापुर ग्रामीण पोलिसात (Police) तक्रार दाखल केली.

तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पसार झालेल्या आरोपीच्या शोधात पोलिसांनी बैतूल गाठले व आरोपी नराधम बापाला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २१ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com