SSC, HSC Result: दहावी-बारावीचा निकाल कधी जाहीर होणार? शिक्षण मंडळाने दिली अत्यंत महत्वाची माहिती

SSC-HSC 2024 Result Date: राज्य मंडळाकडून या वर्षीही घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीचा परिक्षेला अनेक विद्यार्थी बसले होते. त्यानंतर संपूर्ण विद्यार्थी वर्ग आणि पालकांमध्ये निकालाची उत्सुकता पाहायल मिळत आहेत.
SSC-HSC 2024 Result Date
SSC, HSC ResultCanva

राज्य मंडळाकडून या वर्षीही घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीचा परिक्षेला अनेक विद्यार्थी बसले होते. त्यानंतर संपूर्ण विद्यार्थी वर्ग आणि पालकांमध्ये निकालाची उत्सुकता पाहायल मिळत आहेत. त्यातच दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, येत्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करण्यात येईल. त्यानंतर काही दिवसांत दहावीचा निकाल जाहीर होईल.

SSC-HSC 2024 Result Date
Maharashtra Monsoon News : राज्यात योग्य वेळेत मान्सून दाखल होणार, 7 जूनला तळकोकणात

सकाळ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, दहावी (Ten Std)आणि बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकालाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता या दोन्ही इयत्ताच्या निकालाची अंतिम जाहीर झाली आहे.

या पार्श्वभूमीमवर विद्यार्थ्यांसह पालकांना निकाल घरबसल्या पाहता यावा या करिता साधारण पाच ते सहा संकेतस्थेळ उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. बारावीचा निकाल जवळपास २१ किंवा २२ मे रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली असून निकालाची अंतिम तारीख येत्या दोन दिवसांत जाहीर होईल, असे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

बारावी इयत्तेचा निकाल पुढच्या आठवड्यात जाहीर होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नेमक्या कोणत्या दिवशी निकाल लागेल, याबाबत दोन दिवसांत कळवण्यात येईल, असे मंडळातील एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

यंदा दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत घेतली होती. तर १ फेब्रुवारी ते १९ मार्च दरम्यान बारावीची परीक्षा झाली होती. आता लवकरच निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना तो mahahsscboard.in , mahresult.nic.in आणि results.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन पाहता येईल. याशिवाय निकाल वेगवेगळ्या लिंकवरही पाहता येणार आहे. त्या लवकरच जाहीर करण्यात येतील. निकालानंतर पुरवणी परीक्षा वेळेत घेण्यात येतील. त्यांचे निकालही लवकरच घोषित करण्याचा प्रयत्न असेल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

दहावी आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी...

१. महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे.

२. महाराष्ट्र बोर्ड निकाल पोर्टल लिंकवर जा.

३. SSC किंवा HSC निकाल लिंकवर क्लिक करा.

४. रोल नंबर आणि इतर क्रेडेन्शियल एंटर करा.

५. दहावी किंवा बारावीची मार्कशीट तुमच्या समोर स्क्रीनवर तुम्हाला दिसेल.

६. त्यानंतर महाराष्ट्र बोर्डाचा निकाल डाऊनलोड करता येईल.

SSC-HSC 2024 Result Date
Maharashtra Election: नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग; चेकिंग नव्हे स्टंटबाजी, ठाकरे गटाचा आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com