Maharashtra Election: नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग; चेकिंग नव्हे स्टंटबाजी, ठाकरे गटाचा आरोप

Cm Eknath Shinde Bags Checking : निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांच्या बॅगांवरून चांगलंच राजकारण तापलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी हेलिपॅडवरच त्यांच्या बॅगांचं चेकिंग केलं. मात्र राऊतांच्या आरोपांमुळे जनतेची दिशाभूल कऱण्यासाठी ही स्टंटबाजी केल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय. यावरचा हा विशेष रिपोर्ट.
Maharashtra Election: नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग; चेकिंग नव्हे स्टंटबाजी, ठाकरे गटाचा आरोप
Cm Eknath Shinde Bags Checkingsaam tv
Published On

तबरेज शेख

नाशिक : मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये प्रचारासाठी दाखल झाले. ते हेलिकॉप्टरमधून खाली उतरताच पोलिसांचा ताफा तिथे आला. मात्र हा ताफा वेगळ्या कारणासाठी हेलिपॅडवर दाखल झाला. मुख्यमंत्री गेल्यानंतर त्यांच्या सर्व बॅगा पोलिसांनी ताब्यात घेतल्या. आणि त्याच ठिकाणी या सर्व बॅगा तपासण्या आल्या. पोलिसांनी बॅगांची कसून तपासणी केली. मात्र त्यांच्या हाती लागले ते मुख्यमंत्र्यांचे कपडे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मुख्यमंत्र्यांच्या बॅगा अशा अचानक पोलिसांनी का तपासल्या असव्यात. त्यांना काही गुप्त माहिती मिळाली होती का?

तर हे जाणून घेण्यासाठी थोडं मागे जावं लागेल. चौथ्या टप्प्याच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री रविवारी हेलिकॉप्टरमधून नाशिकला गेले. हेलिपॅडवर उतरल्यानंतर त्यांच्या सुरक्षारक्षकांनी दोन जड बॅगा नेल्या असा व्हिडिओ राऊतांनी ट्विट केला. आणि या बॅगांमध्ये 12-13 कोटी रुपये होते असा आरोप करत खासदार संजय राऊतांनी खळबळजनक उडवून दिली. तर कोण संजय राऊत अशी खिल्ली उडवत आपल्या बॅगेत केवळ कपडे होते. पैशांचा वापर करण्याची गरज नाही असं मुख्यत्र्यांनी सामटीव्हीशी बोलताना सांगितलं.

आता मुख्यमंत्री अखेरच्या टप्प्यातल्या प्रचारासाठी पुन्हा नाशिकला आले. मात्र यावेळी पोलिसांनी थेट त्यांच्या बॅगाच चेक केल्या. त्यामुळे पोलिसांच्या सतर्कतेची मोठी चर्चा रंगली. मात्र ही सतर्कता वगैरे नव्हे तर ही केवळ दिशाभूल करण्यासाठी स्टंटबाजी असल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय. तसंच १२ मे रोजी आणलेल्या बॅगांबाबत चौकशी करण्याची मागणीही केलीय.

राज्यात अनेक मतदारसंघांमध्ये मतदानाच्या काळात पैसे वाटण्यावरून आरोप-प्रत्यारोप झाले आणि अनेक तक्रारीही दाखल झाल्या. मात्र थेट मुख्यमत्र्यांनी पैशांच्या बॅगा आणल्या असा आरोप झाल्यानंतर थेट त्यांच्या बॅगाच चेक करण्याचा आल्या. त्यामुळे अखेरच्या टप्प्यातही निवडणूक पैशांच्या पावसावरून गाजणार असल्याचं दिसतंय.

Maharashtra Election: नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग; चेकिंग नव्हे स्टंटबाजी, ठाकरे गटाचा आरोप
Maharashtra Politics 2024 : राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर; शिवाजी पार्कात होणार भव्य प्रचारसभा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com