SSC HSC Result 2024: दहावी-बारावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट; बोर्डाने दिली अत्यंत महत्वाची माहिती

SSC HSC Exam Result 2024 Latest Update: दहावी-बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल नेमका कधी जाहीर होणार, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागून आहे.
SSC HSC Exam Result 2024 Latest Update
SSC HSC Exam Result 2024 Latest UpdateSaam TV

दहावी-बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल नेमका कधी जाहीर होणार, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागून आहे. त्यातच निकालाबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात असल्याने अनेकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशातच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकालाबाबत मोठी अपडेट दिली आहे.

SSC HSC Exam Result 2024 Latest Update
ICSE Bord Result: आयसीएसईच्या दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; कसा आणि कुठे पाहाल? जाणून घ्या

बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावी परीक्षेचा निकाल अखेरच्या आठवड्यात लावण्याचे मंडळाचे प्रयत्न आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही तारखा अद्याप झालेल्या नाही, असं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

त्यामुळे सोशल मीडियावर दिल्या जाणाऱ्या माहितीवर पालक, विद्यार्थी आणि शाळांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर दहावी-बारावीच्या निकालासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली जाते.

यंदाच्या निकालासंदर्भातील तारखाही तेथे जाहीर केल्या जातील. या संकेतस्थळावर जाहीर केलेली निकालाची तारीख अधिकृत असेल, असेही शरद गोसावी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यी आणि पालकांनी इतर गोष्टीवर विश्वास ठेवता बोर्डाच्या साईटवर जाऊन माहिती चेक करणे गरजेचे आहे.

यंदा राज्यात दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च, तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. दहावीच्या परीक्षेला एकूण १७ लाख, तर बारावीसाठी १२ लाख विद्यार्थी बसले होते. मागील वर्षी दहावीचा राज्याचा निकाल ९३.८३ टक्के इतका लागला होता.

SSC HSC Exam Result 2024 Latest Update
Jai Shree Ram Written in Exam : उत्तरपत्रिकेत 'जय श्रीराम' लिहिलं, विद्यार्थी ५६ टक्क्यांनी पास; नेमका घोळ कसा झाला उघड?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com