IMD Rain Alert: महाराष्ट्रासह ५ राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता; वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात मोठा बदल

Maharashtra Weather Update: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील काही राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
imd rain prediction Uttar Pradesh Madhya Pradesh  Chhattisgarh Tamil Nadu for next 2 days maharashtra Weather Update
imd rain prediction Uttar Pradesh Madhya Pradesh Chhattisgarh Tamil Nadu for next 2 days maharashtra Weather Update Saam TV
Published On

IMD Rain Alert in Maharashtra

मागील काही दिवसांपासून देशासह राज्यातील हवामानात सातत्यानं बदल होत आहे. कुठं ढगाळ हवामान तर कुठं थंडीचा कडाका जाणवत आहे. उत्तर भारतात सर्वत्र धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. अशातच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील काही राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

imd rain prediction Uttar Pradesh Madhya Pradesh  Chhattisgarh Tamil Nadu for next 2 days maharashtra Weather Update
LPG Cylinder Price: एलपीजी गॅस सिलिंडर झाला स्वस्त, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारचं गिफ्ट

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशासह राज्यातील हवामान पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे. उत्तरेकडे थंडीची लाट कायम राहणार असून थंडीचा आणखीच कडाका जाणवणार आहे. दक्षिणेकडे मात्र पावसाची शक्यता (Rain Alert) वर्तवण्यात आली आहे.

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू आणि केरळमध्ये आज आणि उद्या पाऊस पडण्याची (Rain News) शक्यता आहे. अनेक राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये पुढील दोन दिवस थंडी वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात कसं असेल हवामान?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील १७ तसेच विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात अशा एकूण २२ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

पुढील आठवडाभरात या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवेल, तर काही जिल्ह्यांमध्ये दाट धुके पडणार, असंही आयएमडीने म्हटलं आहे.

imd rain prediction Uttar Pradesh Madhya Pradesh  Chhattisgarh Tamil Nadu for next 2 days maharashtra Weather Update
Buldhana News: मद्यधुंद कारचालकाने दुचाकीसह ३ ते ४ वाहनांना उडवलं; थर्टी फर्स्टच्या रात्रीच मोठा अपघात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com