महागाई तसेच इंधन दरवाढीत होरपळून निघालेल्या जनतेला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी मिळाली आहे. तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. मात्र, ही कपात फक्त व्यावसायिक सिलिंडरच्या दरात करण्यात आली आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरचे दर जैसे थे आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर करत असतात. गेल्या महिन्यात केंद्राने व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ३०.५० रुपयांची कपात केली होती. त्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला होता.
यावेळी मात्र, व्यावसायिक सिलिंडरचे दर फक्त काहीच रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरच्या दरात २ रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर मुंबईत व्यावसायिक सिलिंडर १.५० रुपयांनी स्वस्त झाला असून त्याची किंमत १७०८.५० रुपयांवर आली आहे.
चेन्नईत व्यावसायिक गॅस सर्वात जास्त ४.५० रुपयांनी कमी झाला असून किंमत १९२४.५० रुपये झाली आहे. दुसरीकडे तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडर म्हणजेच १४ किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही.
३० ऑगस्टला घरगुती गॅसच्या किंमतीत २०० रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर राजधानी दिल्लीत गॅस सिलेंडरची किंमत ९०३ रुपये इतकी झाली होती. सध्या मुंबईत घरगुती गॅस ९०२.५० रुपयांना मिळत आहे. तर चेन्नई घरगुती गॅस ९१८.५० रुपयांना मिळत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.