Buldhana News: मद्यधुंद कारचालकाने दुचाकीसह ३ ते ४ वाहनांना उडवलं; थर्टी फर्स्टच्या रात्रीच मोठा अपघात

Buldhana Accident News: मद्यधुंद कारचालकाने दारुच्या नशेत सुसाट कार चालवत दुचाकीसह ३ ते ४ वाहनांना जोरदार धडक दिली.
Buldhana Car Accident News
Buldhana Car Accident NewsSaam TV
Published On

संजय जाधव, साम टीव्ही | बुलढाणा १ जानेवारी २०२४

Buldhana Car Accident News

एकीकडे देशभरासह राज्यात नववर्षाचं स्वागत जल्लोषात केलं जात असताना दुसरीकडे बुलढाण्यात थर्टी फर्स्टच्या रात्री मोठी दुर्घटना घडली. मद्यधुंद कारचालकाने दारुच्या नशेत सुसाट कार चालवत दुचाकीसह ३ ते ४ वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ४ जण जखमी झाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Buldhana Car Accident News
Vande Bharat Train: जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा तिकीट दर किती? महत्त्वाची माहिती आली समोर...

जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. त्यांना उपचारासाठी शेगाव (Buldhana News) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. थरकाप उडवणारी ही घटना शेगाव -बाळापूर मार्गावर रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त (Accident News) कारमधून ४ तरुण प्रवास करीत होते. कारचालक हा दारुच्या नशेत गाडी चालवत होता. शेगाव -बाळापूर मार्गावर कार आली असता, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले.

क्षणार्धात कार समोरुन जात असलेल्या दुचाकीसह ३ ते ४ वाहनांना धडकली. अपघात इतका भीषण होता, की वाहनांना धडक दिल्यानंतर कार डिव्हाडरवर चढून रस्त्याच्या कडेला उलटली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

मात्र, अपघातात ४ जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी शेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रात्री उशीरापर्यंत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Buldhana Car Accident News
New Year 2024: 'आम्ही सुद्धा 31 ची जय्यत तयारी केली आहे', मुंबई पोलिसांचं भन्नाट ट्वीट होतंय व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com