हुंड्यासाठी मोबाईलवर तीन वेळा 'तलाक' मेसेज पाठवून दिला बेकायदेशीर तलाक!
हुंड्यासाठी मोबाईलवर तीन वेळा 'तलाक' मेसेज पाठवून दिला बेकायदेशीर तलाक!SaamTv

हुंड्यासाठी मोबाईलवर तीन वेळा 'तलाक' मेसेज पाठवून दिला बेकायदेशीर तलाक!

माहेरुन 10 लाख रुपये घेऊन ये म्हणत सासरच्या लोकांनी अतोनात छळ करुन, तसेच पतीने मोबाईलवरुन तलाक.. तलाक.. तलाक.. असा मेसेज पाठवून बेकायदेशीर तलाक दिल्याची घटना अहमदनगरमध्ये उघडकीस आली आहे.
Published on

अहमदनगर : माहेरुन 10 लाख रुपये घेऊन ये म्हणत सासरच्या लोकांनी अतोनात छळ करुन, तसेच पतीने मोबाईलवरुन तलाक.. तलाक.. तलाक.. असा मेसेज पाठवून बेकायदेशीर तलाक दिल्याची घटना अहमदनगरमध्ये उघडकीस आली आहे. तसेच या विवाहितेला घरातून बाहेर देखील काढण्यात आले आहे. सदर प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात, नव्याने करण्यात आलेल्या मुस्लिम महिला विवाह संरक्षण अधिनियामातील कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित विवाहितेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी खालेद ख्वाजा सय्यद (पती), ख्वाजा मैमुद्दीन सय्यद (सासरा), परवेज ख्वाजा सय्यद (दीर), परवीन ख्वाजा सय्यद (सासू), सुग्रावी ख्वाजा सय्यद (सासूची आई) (सर्व रा.मर्कज मस्जिद, रायमोह, ता. शिरुर कासार, जि. बीड) यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

डिसेंबर 2017 मध्ये मुस्लिम धर्मशास्त्रानुसार पीडितेचा विवाह पार पडला. संबंधित विवाहितेच्या पतीला स्टेट बँकेत परमनंट नोकरीसाठी सासरच्या लोकांनी लग्नाच्या वेळीच 15 लाखांची मागणी केली. विवाहितेच्या वडिलांनी लग्नावेळी 3 लाख व नंतर 2 लाख असे पाच लाख रुपये विवाहितेच्या पतीला दिले. त्यानंतरही आणखी दहा लाखांची माणगी करत सासरच्या लोकांकडून विवाहितेचा छळ करण्यात आला. भरोसा सेलमध्ये तक्रार झाल्यानंतर सामोपचाराने वाद मिटविण्यातही आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा विवाहितेचा छळ सुरूच राहिला.

हुंड्यासाठी मोबाईलवर तीन वेळा 'तलाक' मेसेज पाठवून दिला बेकायदेशीर तलाक!
गैरबंजारा नागरीकांना बंजारा जातीचे प्रमाणपत्र!जालन्यातील धक्कादायक प्रकार

26 ऑगस्ट रोजी विवाहितेच्या पतीने तिला मोबाईलवर 'तलाक'चा मेसेज पाठवून बेकायदेशीर तलाक दिला. त्यानंतर घरातून बाहेर काढले. त्यामुळे विवाहितेने बुधवारी 1 तारखेला भिंगार कॅम्प पोलिसात फिर्याद दिली आहे. कॅम्प पोलिसांनी पती, सासू, सासरा, दीर व सासूच्या आईसह पाच जणांविरोधात गुरनं 363/2021, कलम 498(अ), 323, 504, 506, 34, मुमवि (अधि.संरक्षण) अधिनियम 2019 चे कलम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com