अभिजीत सोनवणे, साम टीव्ही
इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद परिसरातून शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील एका नराधम शिक्षकाने आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या महितीनुसार, पीडित विद्यार्थिनी आपल्या भावासोबत शाळेत काही शैक्षणिक कागदपत्रांवर मुख्याध्यापकांची सही आणि शिक्का घेण्यासाठी गेली होती. यावेळी मुख्याधापक बैठकीत असल्याचे सांगून शिक्षकाने मी तुला सही-शिक्के घेऊन देतो असे आमिष दाखवले. त्याने मुलीच्या भावाला कक्षाबाहेर उभे राहण्यास सांगितले आणि विद्यार्थिनीला एकटीला आत नेले.
कक्षात कुणीही नसल्याची संधी साधत या शिक्षकाने विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केले आणि लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव करत तिच्याकडे अश्लील मागणी केली. या प्रकाराने घाबरलेल्या विद्यार्थिनीने तातडीने कागदपत्रे हातात घेतली आणि तिथून पळ काढला. सकाळी पालक घरी परतल्यानंतर त्यांना मुलगी रडतान दिसली. पालकांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने शाळेत घडलेला सर्व धक्कादायक प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळताच संतप्त पालकांनी आणि गावकऱ्यांनी तातडीने शाळा गाठून संबंधित शिक्षकाला जाब विचारला.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने पावले उचलली आणि नराधम शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा आणि भारतीय दंडसाहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी याच शाळेत एका 13 वर्षीय विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकानेच अत्याचार केल्याची घटना घडली होती. हीन घटना ताजी असतानाच आता पुन्हा शिक्षकानेच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याने पालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.