IAS तुकाराम मुंढेंनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार; २१ वर्षांत २५ वी बदली

IAS Tukaram Mundhe latest news : कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे IAS तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. २१ वर्षांच्या सेवेत त्यांची ही २५ वी बदली ठरली आहे.
IAS Tukaram Mundhe FDA charge
IAS officer Tukaram Mundhe assumed charge as Maharashtra Food and Drug Administration Commissioner.Saam TV marathi
Published On

Tukaram Mundhe, IAS officer Maharashtra : कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे IAS तुकाराम मुंढे यांनी आज अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. २१ वर्षांच्या प्रशासकीय सेवेतील त्यांची ही २५ वी बदल होती. २००५ मध्ये सोलापूरमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून पहिली पोस्टिंग झाली होती. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी बदल्यांची सिल्हर जुबली पार केली आहे. दीड महिन्यापूर्वीच मार्च महिन्यातच त्यांची आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागात बदली झाली होती. पण २ महिन्याच्या आत पुन्हा एकदा त्यांची बदली झाली आहे.

तुकाराम मुंढे कडक प्रशासकीय शैलीमुळे आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या कणखर भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आणि विविध सरकारी विभागांमध्ये काम करताना त्यांनी जनतेच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले. त्यामुळे त्यांना नवी ओळख मिळाली. नियमांचे काटेकोर पालन, प्रशासनात पारदर्शकता आणणे आणि बेकायदेशीर कामांना पायबंद घालणे ही त्यांच्या कामाची जमेची बाजू ठरली. राजकीय दबावाला बळी न पडता, सामान्यांच्या हक्कासाठी धाडसी निर्णय घेणारा अधिकारी म्हणूनही त्यांना ओळखले जाते.

IAS तुकाराम मुंढे यांनी आज दुपारी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. तुकाराम मुंढे यांची ही तब्बल २५ वी बदली होय. दीड महिन्यांपूर्वीच तुकाराम मुंढे यांची दिव्यांग विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागात बदली करण्यात आली होती. काही काळापासून अन्न आणि औषध प्रशासन विभाग भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत राहिलाय, त्या ठिकाणी आता तुकाराम मुंढे यांची बदली झाली आहे.

IAS Tukaram Mundhe FDA charge
Pune curfew : पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; शहरात १४ दिवसांसाठी जमावबंदी, काय सुरू अन् काय बंद?

तुकाराम मुंढे यांची २००५ पासून आतापर्यंत कुठे कुठे बदली झाली? Tukaram Mundhe transfer list

  • ऑगस्ट 2005 - प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर.

  • सप्टेंबर 2007 - उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग.

  • जानेवारी 2008 - सीईओ, जिल्हा परिषद नागपूर.

  • मार्च 2009 - आयुक्त, आदिवासी विभाग.

  • जुलै 2009 - सीईओ, वाशिम.

  • जून 2010 - सीईओ, कल्याण.

  • जून 2011 - जिल्हाधिकारी, जालना.

  • सप्टेंबर 2012 - विक्रीकर सहआयुक्त मुंबई.

  • नोव्हेंबर 2014 - सोलापूर जिल्हाधिकारी.

  • मे 2016 - आयुक्त, नवी मुंबई महापालिका.

  • मार्च 2017 - मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे.

  • फेब्रुवारी 2018 - आयुक्त, नाशिक महापालिका.

  • नोव्हेंबर 2018 - सहसचिव, नियोजन.

  • डिसेंबर 2018 - प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई.

  • जानेवारी 2020 - आयुक्त, नागपूर महापालिका.

  • ऑगस्ट 2020 - सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.

  • जानेवारी 2021 - राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत.

  • सप्टेंबर 2022 - आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान.

  • एप्रिल 2023 - सचिव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

  • जून 2023 - सचिव मराठी भाषा विभाग

  • जुलै 2023 -कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सचिव

  • जून 2024 - असंघटित कामगार विभाग

  • ऑगस्ट 2025 - दिव्यांग कल्याण विभाग

  • मार्च 2026 - आपत्ती व्यवस्थापन, महसूल आणि वन विभाग

  • मे 2026 - अन्न आणि औषध प्रशासन विभाग

IAS Tukaram Mundhe FDA charge
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेमुळं तिजोरीवर खूप ताण पडलाय, भाजप खासदाराचं खळबळजनक वक्तव्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com