

Chandrayaan-3 Launch Date, Time, How To Watch: भारतीय अंतराळ संशोधन संस्थने (ISRO) बहुप्रतिक्षित चांद्रयान-3 या मोहिमेच्या प्रक्षेपणाबाबत मोठी घोषणा केली आहे. इस्रोने चांद्रयान-३ या मोहिमेच्या प्रक्षेपण तारख जाहीर केली आहे. 13 जुलै रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता हे रॉकेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
चांद्रयान-३ चं लक्ष्य चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करणे हे आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास भारताचे हे आणखी एक मोठे यश असेल असे इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2:35 वाजता चांद्रयान-3 चंद्राच्या दिशेने उड्डाण करेल. सुमारे ४५ ते ५० दिवसांच्या प्रवासानंतर ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल. चांद्रयान-3 चंद्रावर पाठवण्यासाठी LVM-3 लाँचरचा वापर केला जाईल. हे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅड-2 वरून होणार आहे.
काय आहे चांद्रयान-3 मोहीम?
चार वर्षांपूर्वी 2019 मध्ये चांद्रयान-2 मोहीम करण्यात आली होती. चांद्रयान-3 हे त्याचेच फॉलो-अप मिशन आहे. यात लँडर ची सॉफ्ट लँडिंग करण्यात येणार असून रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर चालवले जाणार आहे.
काय आहे चांद्रयान-3 चा उद्देश?
चंद्राच्या पृष्ठभागावरील, वातावरणातील आणि जमिनीच्या आतल्या हालचाली जाणून घेणे हा याचा चांद्रयान-3 मोहिमेचा उद्देश आहे. तसेच इस्रोच्या शास्त्रज्ञांना जगाला दाखवून द्यायचे आहे की भारत देखील दुसऱ्या ग्रहावर सॉफ्ट लँडिंग करू शकतो आणि आपला रोव्हर तिथे चालवू शकतो.
चांद्रयान-3 आणि चांद्रयान-2 मध्ये काय फरक?
चांद्रयान-2 मध्ये लँडर, रोव्हर आणि ऑर्बिटर होते. चांद्रयान-३ मध्ये ऑर्बिटरऐवजी स्वदेशी प्रोपल्शन मॉड्यूल आहे. गरज पडल्यास चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरची मदत घेतली जाईल. प्रोपल्शन मॉड्यूल हे चांद्रयान-3 चा लँडर आणि रोव्हरला चंद्राच्या पृष्ठभागावर सोडेल. त्यानंतर ते चंद्राच्या कक्षेपासून 100 किलोमीटरवर राहून प्रदक्षिणा घालेल. हे कम्युनिकेशनसाठी आहे.
चांद्रयान-3 मध्ये किती पेलोड्स आहेत?
पेलोड्स म्हणजे अशी यंत्र असतात जी कोणत्याही प्रकारची तपासणी करू शकतात. चांद्रयान-३ च्या लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये एकूण सहा पेलोड्स जात आहेत. लँडर Rambha-LP, ChaSTE आणि ILSA ने सुसज्ज आहे, तर रोव्हरमध्ये APXS आणि LIBS बसवलेले आहेत. याशिवाय प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये SHAPE हा पेलोड बसवलेला आहे.
चांद्रयान-3 किती दिवस काम करेल?
इस्रोच्या शास्त्रज्ञांना अंदाजानुसार लँडर आणि रोव्हर चंद्रावर एक दिवस काम करेल. प्रोपल्शन मॉड्यूल तीन ते सहा महिने काम करू शकतो. परंतु हे तिन्ही यंत्र यापेक्षा जास्त काळही काम करू शकतात. कारण इस्रोचे बहुतेक उपग्रह अपेक्षेपेक्षा जास्त चालले आहेत.
लॉन्चसाठी कोणते रॉकेट वापरले जाणार?
चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणासाठी इस्रो LVM-3 लाँचर वापरत आहे. या रॉकेटमध्ये अतिशय जड उपग्रहही अवकाशात सोडण्याची क्षमता आहे. LVM-3 रॉकेट हे 43.5 मीटर म्हणजे सुमारे 143 फूट उंच आहे, तर त्याचे वजन 642 टन एवढे आहे. LVM-3 रॉकेटचे हे चौथे उड्डाण असेल. हे रॉकेट चांद्रयान-3 ला जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये म्हणजे 170x36500 किलोमीटरची अंडाकृती कक्षेत सोडेल. यापूर्वी याला GSLV-MK3 असे संबोधले जात होते, ज्याने ६ यशस्वी प्रक्षेपण केले आहेत. (Breaking News)
या मोहिमचा सर्वात कठीण टप्पा कोणता?
चांद्रयान-3 चे चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करणे हे हा या मोहिमेचा सर्वात कठीण टप्पा आहे. कारण 2019 मध्ये चांद्रयान-2 विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर जोरात आदळले होते. त्यामुळे ते मिशन अर्धवट राहिले. यावेळी चांद्रयान-३ च्या लँडरच्या थ्रस्टरमध्ये बदल करण्यात आले आहेत. सेन्सर अधिक संवेदनशील बसविण्यात आले आहेत.
लँडर-रोव्हर किती दिवसांनी चंद्रावर उतरेल?
चांद्रयान-3 चे प्रक्षेपण 14 जुलै 2023 होणार आहे. यानंतर 45 ते 50 दिवसात लँडर आणि रोव्हर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल. या दरम्यान हे अभियान 10 टप्प्यात पूर्ण केले जाईल. (Tajya Marathi Batmya)
आत्तापर्यंत किती देशांनी चंद्रावर केले सॉफ्ट लँडिंग?
याआधी जगातील 4 देशांनी चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न केला. एकूण 38 वेळा सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न झाला. परंतु सर्वच मोहिमा यशस्वी झाल्या नाहीत.
चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंगचा दर किती?
चार देशांनी केलेल्या प्रयत्नात सॉफ्ट लँडिंगचे यशाचे प्रमाण केवळ 52 टक्के आहे, म्हणजे या मोहिमेच्या यशाची अपेक्षा केवळ 50 टक्के केली जाऊ शकते. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.