सचिन कदम, रायगड प्रतिनिधी
Two Mahad MIDC workers killed in Raigad road accident : रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २ जण जखमी झाले आहेत. महाड MIDC मधील बिर्ला ओपस कंपनीत काम करणारे चौघेजण श्रीवर्धन येथे फिरण्यासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात असताना त्यांच्या वॅगनआर कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळली.
नेमका अपघात कसा घडला?
स्थानिक प्रतिनिधीकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाड MIDC मधील कामगार मनन पांचाळ, साईराज भोसळ, अभिषेक देवघरे आणि अर्यन शिंदे हे चौघेजण श्रीवर्धन येथे फिरण्यासाठी गेले होते. श्रीवर्धनहून पुन्हा परत येत असताना म्हसळा बायपासच्या तीव्र उतारावर चालकाचा कारवरील ताबा सुटला. वेगात असलेली कार रस्त्याच्या शेजारी असलेल्या खड्ड्यात जाऊन कोसळली अन् चेंदामेंदा झाली.
हा अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्णपणे चुराडा झाला. या दुर्घटनेत मनन पांचाळ आणि साईराज भोसळ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अभिषेक देवघरे आणि अर्यन शिंदे हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे. दोन होतकरू तरूणांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घेतली आणि मदतकार्य केले. या अपघातातील दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी जवळच्या सरकारी रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. महाड MIDC मधील सहकाऱ्यांच्या दुर्दैवी निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.