विद्यार्थ्यांसाठी १२८ दिवसांच्या सुट्ट्यांचे नियोजन जाहीर; 16 दिवसांची दिवाळीची सुट्टी; 24 नोव्हेंबरला ही सुट्टी

Hingoli School Holiday List for Academic Year 2026-27: हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या सुट्ट्यांचे नियोजन जाहीर. विद्यार्थ्यांना मिळणार १२८ दिवसांच्या सुट्ट्या, दिवाळीची सुट्टी, शाळा पुन्हा कधी सुरू होणार?
HINGOLI SCHOOL HOLIDAYS 2026-27
HINGOLI SCHOOL HOLIDAYS 2026-27saam tv
Published On: 

संदीप नागरे, साम टीव्ही

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळांच्या सुट्ट्यांचे अधिकृत नियोजन प्रसिद्ध केले आहे. यानुसार जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना ५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना एकूण १२८ दिवस सुट्ट्या मिळणार असून २३७ दिवस शैक्षणिक कामकाज होणार आहे.

HINGOLI SCHOOL HOLIDAYS 2026-27
मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक-कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू, धडकेनंतर उघडलं गांजाचं गुपित

दिवाळीच्या सुट्ट्या २३ नोव्हेंबर रोजी संपणार आहेत. मात्र, २४ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांना आणखी एक दिवस सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे २५ नोव्हेंबर २०२६, बुधवारपासून जिल्ह्यातील सर्व शाळा नियमितपणे सुरू होतील. जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांसाठी हे नियोजन लागू असणार आहे.

HINGOLI SCHOOL HOLIDAYS 2026-27
पोलीस कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड; ४६ अंमलदारांना मिळाली पदोन्नती, सातारा पोलीस दलात मोठा निर्णय

कसे आहे सुट्ट्यांचे नियोजन?

शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या नियोजनानुसार, ३६५ दिवसांच्या वर्षामध्ये एकूण १२८ दिवस सुट्ट्यांसाठी निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये ५२ रविवार, ५७ अन्य सार्वजनिक सुट्ट्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातील ३ सुट्ट्या, संस्था किंवा शाळा स्तरावरील २ सुट्ट्या आणि दिवाळीच्या १४ सुट्ट्यांचा समावेश आहे. रविवार आणि इतर सार्वजनिक सुट्ट्या वगळून दिवाळीच्या सुट्ट्यांची गणना करण्यात आली आहे.

HINGOLI SCHOOL HOLIDAYS 2026-27
Maharashtra Rainfall: पुढचे ५ दिवस तुफान पावसाचे, विजांचा कडकडाट अन् वादळी वारे; कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?

शैक्षणिक वर्षात २३७ कार्यदिवस

या नियोजनानुसार, विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शैक्षणिक कामकाजासाठी एकूण २३७ दिवस मिळणार आहेत. सुट्ट्यांच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाचा सराव करावा, तसेच पर्यावरणपूरक उपक्रम राबवावेत, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर शाळा नेमक्या २५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांनी या अधिकृत वेळापत्रकानुसार आपल्या नियोजनात बदल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.