डिझेल नसल्याचे कारण देत अॅम्बुलन्स सेवा नाकारली गरोदर महिलेच्या पोटात नवजात बाळाचा मृत्यू

hingoli pregnant women case : डिझेल नसल्याचे कारण देत रुग्णवाहिका सेवा नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे गरोदर महिलेच्या पोटात नवजात बाळाचा मृत्यू झालाय.
hingoli shocking
hingoli pregnant womenSaam tv
Published On
Summary

हिंगोलीत गरोदर मातेच्या पोटात नवजात बाळाचा मृत्यू

नवजात बाळाच्या मृत्यूने आरोग्यवस्थेचे उडाले धिंडवडे

दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

हिंगोलीत व्यवस्थेने एका गरोदर मातेच्या पोटातील काळजाचा तुकडा हिरावून नेल्याचा प्रकार पुढे आलाय. राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडविणारा संतापनक प्रकार ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी म्हणून ओळख असलेल्या आरोग्य उपकेंद्रात घडलाय. यामुळे आरोग्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत.

हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील जवळा बाजारामधील आरोग्य उपकेंद्र या उपकेंद्रावर 25 पेक्षा जास्त गावांच्या नागरिकांनी आरोग्य सेवा अवलंबून आहे. सुसज्ज इमारत भौतिक सुविधा सफाई कर्मचारी आणि डॉक्टर अशा सुखसुविधानी परिपूर्ण दिसणारे हे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मात्र सद्या शोभेची वस्तू म्हणून ओळखल्या जाऊ लागलं आहे. याला कारणही तसंच आहे.

ज्या इमारतीमध्ये आई बहिणीची काळजी घेण्यासाठी सरकारने कोट्यावधी रुपये खर्च केला. तिथेच रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याने एका गरोदर मातेला आपल्या पोटच्या गोळ्याला मुकावे लागले आहे. प्रसूतीच्या असह्य वेदनेने विवळत पडलेल्या मनिषा ओमप्रकाश इंगळे या महिलेला उपचारासाठी जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रातून हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी हलवण्याचा सल्ला दिला.

hingoli shocking
निवडणुकीआधी पेटलं 'हलाल' राजकारण? गोकुळचा हलाल सर्टिफिकेटचा वाद कशाला?

नातेवाईकांनी तातडीने शासनाच्या 108 या प्रसुतीसाठी सुरू केलेल्या रुग्णवाहिकेला फोन केला, परंतु फोन करून एक तासाचा कालावधी उलटून गेला असताना रुग्णवाहिका पोहोचली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा नातेवाईकांनी संपर्क केला असता रुग्णवाहिकेत डिझेल उपलब्ध नसल्याने रुग्णवाहिका मिळणार नसल्यास आरोग्य व्यवस्थापनाने सांगितलं.

तब्बल दीड तास थांबून देखील रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्यामुळे आणि गरोदर माता वेदनेने त्रस्त असल्याने अखेर नातेवाईकांनी खासगी रुग्णवाहिका बोलावून घेत पैसे खर्च करून हिंगोलीचा शासकीय रुग्णालय गाठलं. मात्र उपचाराला उशीर झाल्याने तिथे जे घडलं ते सगळ्यांनाच हादरवून टाकणार होतं. कारण प्रसुतीदरम्यान मनीषा इंगळे यांच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितलं आणि यामुळे नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली.

hingoli shocking
Albattya Galbattya Natak: कल्याणच्या नाट्यगृहाची अवस्था पाहून कलाकार संतापले; 'अलबत्या गलबत्या' कलाकारांचा व्हिडिओ व्हायरल

या धक्कादायक प्रकारानंतर हिंगोलीच्या आरोग्य विभागाने मात्र भलतंच कारण सांगितल आहे. रुग्णालयातील रुग्णवाहिकेमध्ये डिझेल उपलब्ध होतं, मात्र गाडीचा चालक उपलब्ध नसल्याचे सांगत जबाबदारीतून हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. तर माध्यमांमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आता आरोग्य यंत्रणेने चार जणांची चौकशी समिती देखील नेमली आहे

मात्र या सगळ्या गंभीर प्रकारानंतर राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांनी मात्र या प्रकरणात सखोल चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. तर राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी देखील डिझेल उपलब्ध नसल्यास आणि यात आरोग्य अधिकारी दोषी असल्यास कठोर कार्यवाहीचा इशारा दिला आहे.

hingoli shocking
निवडणुकीआधी पेटलं 'हलाल' राजकारण? गोकुळचा हलाल सर्टिफिकेटचा वाद कशाला?

तर या संपूर्ण प्रकरणांमध्ये नेमकं दोषी कोण आहे, असा संतप्त सवाल करत रोहिणी खडसे यांनी देखील आरोग्य विभागावर ताशेरे ओढले आहेत, व्यवस्थेने या बाळाचा खून केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com