Hingoli News Mid Day Meal
Hingoli News Mid Day MealSaam tv

Hingoli News: माध्यान्ह भोजनात आढळला विषारी किडा; गावकऱ्यांनी जेवण केले परत

Hingoli News : मध्यान भोजनात आढळला विषारी किडा; गावकऱ्यांनी जेवण केले परत
Published on

हिंगोली : शालेय विध्यार्थींना शाळेत मध्यान्ह भोजन दिले जाते. त्यानुसार आता बांधकाम मजुरांना (Hingoli) देखील माध्यान्ह भोजन देण्याची योजना शासनाने सुरु केली आहे. परंतु या माध्यान्ह भोजनाबाबत तक्रार येणे सुरूच आहे. निकृष्ट दर्जाचे हे भोजन असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. यात आता भोजनात किडे आढळून आल्याचा प्रकार हिंगोलीत समोर आला आहे. (Tajya Batmya)

Hingoli News Mid Day Meal
Nandurbar News: तिन्ही तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस; ११ मंडळांमध्ये दुष्काळी परिस्थिती

राज्य शासनाच्या कामगार विभागा मार्फत बांधकाम मजुरांना देण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजनात विषारी किडे निघाल्याचा धक्कादायक प्रकार हिंगोलीत उघडकीस आला आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील जवळा पळशी गावात तुरीच्या डाळीमध्ये नाकतोडा नावाचा किडा आढळला असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे. 

Hingoli News Mid Day Meal
Pune News : पोलिसांना चकवा देत आरोपी फरार; ससून रुग्णालयात दाखल असताना पलायन

भोजन केले परत 

सदर प्रकारानंतर या गावकऱ्यांनी माध्यान्ह भोजन योजनेच्या (Mid Day Meal) कंत्राटदाराकडून वाटप करण्यात आलेले जेवण परत करून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. या आधी देखील माध्यान्ह भोजन योजनेच्या कंत्राटदाराकडून उत्कृष्ट दर्जाचे जेवण पुरवठा होत असल्याने शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी भोजन व्यवस्थापकाच्या कानाखाली लगावत जाब विचारला होता. यानंतर पुन्हा भोजनात कीड आढळून आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com